• Download App
    भुजबळांनी ओबीसी कार्ड पुढे करताच फडणवीसांचे वर्मावर बोट; राष्ट्रवादीत फक्त नावालाच ओबीसी चेहरे, पदे नाही देत!!|As soon as Bhujbal presented the OBC card, Fadnavis pointed at Verma

    भुजबळांनी ओबीसी कार्ड पुढे करताच फडणवीसांचे वर्मावर बोट; राष्ट्रवादीत फक्त नावालाच ओबीसी चेहरे, पदे नाही देत!!

    प्रतिनिधी

    चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकऱ्या फिरवण्याची राजकीय मशक्कत जोरात सुरू असताना अजितदादांनी राष्ट्रवादीचेचे प्रदेशाध्यक्ष पद मागताच छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड पुढे करत प्रदेशाध्यक्ष जर मराठा समाजाचा असेल तर ओबीसी समाजाला किंवा दुसऱ्या छोट्या समाजाला विरोधी पक्षनेते पद द्या, अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि अन्य पक्षांची उदाहरणे दिली हे पक्ष ओबीसी नेत्यांना मोठमोठे पदे देत असल्यास निर्वाळा दिला.As soon as Bhujbal presented the OBC card, Fadnavis pointed at Verma

    आता याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे. राष्ट्रवादीत फक्त नावालाच ओबीसी चेहरे आहेत. त्यांना पदे देत नाहीत, असा टोला फडणवीस यांनी चंद्रपूरातून लगावला. आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आणि नंतरच्या महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणात कायम खोडा घातला. ते कायद्याच्या जंजाळात अडकवत राहिले. पण भाजपचे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण आम्ही दिले, असेही फडणवीस म्हणाले.



    त्याचबरोबर केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये जेवढे ओबीसी मंत्री आज आहेत, तेवढे ओबीसी मंत्री काँग्रेसच्या मंत्रिमंडळात कधीच नव्हते. आजही एक ओबीसी नेता भारताच्या पंतप्रधान पदावरून जगात भारताचा सन्मान वाढवत आहे, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष जोरात सुरू असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड पुढे केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पद आल्यानंतर अजित पवारांकडे संघटनेतले मोठे पद अर्थात प्रदेशाध्यक्ष जाणार असेल, तर ओबीसी आणि बाकीच्या नेत्यांच्या हाताला काही लागणार नाही याची जाणीव होताच भुजबळांनी ओबीसी कार्ड पुढे केले. त्यांनी विरोधी पक्ष नेते अथवा बाकीची मोठी पदे ओबीसी समाजासाठी मागितली.

    या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या वर्मावर नेमकेपणाने बोट ठेवत राष्ट्रवादीत एकाच समाजाचे चालते. ओबीसी चेहरे फक्त नावाला असतात. त्यांना पदे देत नाहीत, असे वक्तव्य केले.

    As soon as Bhujbal presented the OBC card, Fadnavis pointed at Verma

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस