वृत्तसंस्था
पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संचालकपदी डॉ. आशिष लेले यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.As a director of NCL Dr. Selection of Ashish Lele
डॉ. श्रीवरी चंद्रशेखर यांच्याकडे असलेला अतिरिक्त पदभार त्यांनी स्वीकारला. एनसीएलच्या कॉम्प्लेक्स पल्युड, पॉलीमर डायनॅमिक्स आणि पॉलिमर प्रोसेसिंग या विभागाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
डॉ. लेले यांनी मुंबई विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे १९९३ मध्ये अमेरिकेच्या डेलावर विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी पूर्ण केली आहे.
डॉ. लेले यांचे ७५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध असून, त्यांच्या नावावर सहा पेटंट आहेत. त्यांना २००६ मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.