• Download App
    Aryan Khan Drug Case: छगन भुजबळ म्हणाले - शाहरुख खान भाजपमध्ये गेला, तर ड्रग्जसुद्धा साखर होईल! । Aryan Khan Drug Case Minister Chhagan Bhujbal said drugs will become Sugar powder as soon as Shahrukh Khan joins BJP

    Aryan Khan Drug Case: छगन भुजबळ म्हणाले – शाहरुख खान भाजपमध्ये गेला, तर ड्रग्जसुद्धा साखर होईल!

    बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित प्रकरणावरून एनसीबी आणि भाजपवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आर्यन प्रकरणाबाबत शनिवारी भाजपवर हल्लाबोल केला. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर‘ड्रग्ज साखर बनून जाईल’, असे छगन भुजबळ यांनी शनिवारी सांगितले. Aryan Khan Drug Case Minister Chhagan Bhujbal said drugs will become Sugar powder as soon as Shahrukh Khan joins BJP


    प्रतिनिधी

    बीड : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित प्रकरणावरून एनसीबी आणि भाजपवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आर्यन प्रकरणाबाबत शनिवारी भाजपवर हल्लाबोल केला. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर‘ड्रग्ज साखर बनून जाईल’, असे छगन भुजबळ यांनी शनिवारी सांगितले. याआधी नवाब मलिक यांनी आर्यनच्या केसचे इंचार्ज समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती आणि त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरात जप्त करण्यात आलेल्या ३,००० किलो हेरॉईनच्या प्रकरणाचा तपास करण्याऐवजी एनसीबी शाहरुख खानचा पाठलाग करत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात एका जाहीर कार्यक्रमाला संबोधित करताना भुजबळ म्हणाले, “शाहरुख खान भाजपमध्ये आल्यास ड्रग्जचे साखरेत रूपांतर होईल.”


    बीडमध्ये उपोषण करणारी महिला थेट झाडावर; प्रशासनाची उडाली तारांबळ; अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप


    26 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी

    या प्रकरणातील आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आर्यन खान सध्या मध्य मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. यापूर्वी एनडीपीएस न्यायालयाने त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि फॅशन मॉडेल मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. या तिघांना जामीन नाकारताना विशेष न्यायालयाने म्हटले होते की, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटवर प्रथमदर्शनी असे दिसून येते की तो नियमितपणे बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतला होता आणि तो अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होता. आर्यन खानला माहिती होते की, त्याचा मित्र आणि सहआरोपी अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज आहेत.

    Aryan Khan Drug Case Minister Chhagan Bhujbal said drugs will become Sugar powder as soon as Shahrukh Khan joins BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!