प्रतिनिधी
मुंबई : मशिदींवरचे भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असे आदेश देणाऱ्या राज ठाकरे यांना समाजात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करायचा आहे. दंगल घडवायची आहे, असा आरोप करत समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली आहे. अबू आझमी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली आहे.Arrest Raj Thackeray; Abu Azmi’s demand to meet Sharad Pawar
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण करून मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भात इशारा दिला होता. मशिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण तापले असून मनसे आणि भाजप सोडून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे पण आता शाब्दिक शरसंधानाची जागा राज ठाकरे यांच्या अटकेच्या मागणीने घेतली असून अबू आझमी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांची 12 एप्रिलला ठाण्यामध्ये सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केल्यानंतर तिचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटणे अपरिहार्य आहे. याबाबत अद्याप मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्याची प्रतिक्रिया मोठी उमटेल अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
Arrest Raj Thackeray; Abu Azmi’s demand to meet Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले
- डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले; कोस्टारिका बेटावरील दुर्घटना
- आंध्रच्या अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा : 24 मंत्र्यांचा मुख्यमंत्री जगनमोहन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द, 11 एप्रिलला नवीन मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता
- Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी एकनाथ खडसे पोलिसांसमोर हजर