विशेष प्रतिनिधी
मुंबई : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या सुमारे २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.Arrangement of special aircraft to bring students stranded in Manipur to Maharashtra; Eknath Shinde’s testimony from Karnataka
महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
Arrangement of special aircraft to bring students stranded in Manipur to Maharashtra; Eknath Shinde’s testimony from Karnataka
महत्वाच्या बातम्या
- बजरंग दलावरील बंदीचे आश्वासनामुळे काँग्रेसचीच कोंडी, खरगे यांना मिळाली 100 कोटींची कायदेशीर नोटीस, आता म्हणताहेत ‘जय बजरंग बली’
- Satyapal Malik Profile : 4 पक्ष सोडून भाजपमध्ये आले सत्यपाल मलिक, एकदाच जिंकली लोकसभा निवडणूक, वाचा 50 वर्षांचा राजकीय प्रवास
- भाजपविरोधातील ‘रेट कार्ड’ जाहिरातींवर निवडणूक आयोगाने काँग्रेसला पाठवली नोटीस, द्यावे लागणार उत्तर
- पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता; पण अजित पवारांच्या वर्तणूकीमुळे निर्णय फिरवला; राज ठाकरेंचा दावा