विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेतली. समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी समिती सदस्यांच्या आंदोलनाला अण्णांनी पाठिंबा दिला. आंदोलनात सहभागी होऊ, असे आश्वासन दिले.Anna Hazare again Will agitate on to open Temples in State
दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी आहेत. तेथे गर्दीतून कोरोना वाढत नाहीय का ? असा सवाल केला. मंदिरातील दर्शनाने सात्विक विचारातून माणसे घडतात. पण, मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना अण्णा हजारे संतापले. मंदिर बचाव कृती समितेने आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईन,असे हजारे म्हणाले.
- अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार
- मंदिर बचाव कृती समितीला दिला पाठींबा
- समिती सदस्यांच्या आंदोलनाला समर्थन
- राज्यात दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी
- मंदिर का बंद आहेत? सरकारला खडा सवाल
- मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ?