• Download App
    Anjali demania targets Sharad Pawar पवारांना वाटली बीडच्या

    पवारांना वाटली बीडच्या कायदा सुव्यवस्थेची चिंता; अंजली दमानियांनी काढले पवारांच्या “संस्कारांचे” वाभाडे!!

    Anjali demania targets Sharad Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बीडमध्ये पवार संस्कारित नेत्यांनचे सगळे राडे उघड्यावर आल्यानंतर शरद पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता वाटायला लागली. त्यांनी ती पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पण अंजली दमानिया नेमकेपणाने बोट ठेवत पवारांच्या “संस्कारांचे” वाभाडे काढले. बीड मधली कायदा आणि व्यवस्था बिघडवणाऱ्या नेत्यांना मोठं करण्यात तुमचाच तर हातभार लागला होता, अशा शब्दांमध्ये अंजली दमानिया यांनी पवारांना सुनावले. खोक्याच्या घरावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. 13 तारखेला अतिशय चुकीची कारवाई झाली, असं नको व्हायला होतं. प्रत्येकाने कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण तसं होत नाहीये, असं अंजली दमानिया म्हणाल्या.Anjali demania targets Sharad Pawar over deterioration of law and order situation in beed

    बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा होता. हा जिल्हा अत्यंत शांत होता. आज जो बीड आहे, तसा पूर्वी कधीच नव्हता. मी स्वतः त्यात लक्ष घालायचो, तेव्हा आमचे ५ – ६ लोकं निवडून यायचे, पण आता सत्तेचा दुरुपयोग वाढल्याने बीडची आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले‌. शरद पवार यांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या लोकांमुळे आज बीडची परिस्थिती गंभीर झाली आहे, ते लोक तुमच्याच तालमीत मोठे झाले आहेत, असा पलटवार अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्यावर केला.



    एक पंकजा मुंडे सोडल्या तर बीडची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेत धनंजय मुंडे असोत, संदीप क्षीरसागर असोत, की सुरेश धस असोत, किंवा आधीचे जयदत्त क्षीरसागर असोत, बजरंग सोनावणे असोत, हे सगळेच्या सगळे लोक शरद पवार यांच्याच तालमीत वाढलेत. हे सगळे लोक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. बीडची स्थिती गंभीर आहे असं शरद पवार म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचाच हातभार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

    तृप्ती देसाई माहिती देणार

    यावेळी त्यांनी तृप्ती देसाई यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. तृप्ती देसाई यांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून एक नोटीस पाठवण्यात आली होती. काही पोलीस अधिकाऱ्यांची त्यांच्याकडे माहिती आहे. हे लोक वाल्मिक कराडच्या जवळचे होते. त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. त्याचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे. मला वाटतं तृप्ती देसाई सोमवारी जाऊन एसपींना याची संपूर्ण माहिती देणार आहे, असं दमानिया म्हणाल्या.

    त्यात तथ्य असतं कधी कधी

    आताच माझं तृप्ती देसाईंशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडे ती पूर्ण माहिती आहे. 26 च्या 26 अधिकाऱ्यांनी पदोपदी कुठे कुठे कोणा कोणाला साथ दिली? कोणाचे गुन्हे पाठीशी घातले? कोणाला मदत केली? कुठल्या कुठल्या आरोपींना मदत केली? ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. त्या 26 तारखेला सोमवारी एसपीए कार्यालयाकडे जाऊन सकाळी 11.30 वाजता माहिती देणार आहेत. सरकारला हे समजून घेणे गरजेचे आहे की, जेव्हा लोकं बोलतात, तेव्हा त्याच्यामागे काहीतरी तथ्य असतं, असंही त्या म्हणाल्या.

    Anjali demania targets Sharad Pawar over deterioration of law and order situation in beed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार