• Download App
    Anjali Damania's Warrant: Shirpur Court Orders Appearance on September 23 अंजली दमानियांना शिरपूर न्यायालयाचे वॉरंट

    Anjali Damania : अंजली दमानियांना शिरपूर न्यायालयाचे वॉरंट; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ खडसे मानहानी प्रकरण

    Anjali Damania

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : Anjali Damania माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत 12 ऑगस्ट 2016 रोजी फिर्याद दाखल केली होती.Anjali Damania

    हा खटला अनेक महिन्यांपासून चर्चेत होता आणि आता न्यायालयाने वॉरंट जारी केल्याने या प्रकरणात नवीन वळण आले आहे. त्यामुळे, आता अंजली दमानिया यांना लवकरच या प्रकरणात न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे, असे दिसते.Anjali Damania



    या पार्श्वभूमीवर, शिरपूर न्यायालयाने अंजली दमानिया यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. शिरपूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनीही या आरोपांवर संताप व्यक्त केला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अनेक भाजप कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवले आणि तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

    अंजली दमानिया आज न्यायालयात गैरहजर राहिल्याने शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने त्यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अंजली दमानिया यांनी गेल्या काही महिन्यात महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी करत सरकारवर दबाव आणला होता. तसेच मी नेहमी सत्याची बाजू घेते, कोणाच्या दबावाला बळी न पडता आपले काम करत असल्याचे दमानिया यांनी म्हटले होते.

    Anjali Damania’s Warrant: Shirpur Court Orders Appearance on September 23

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !