विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा येथील सुमारे 40 एकर जमीन विक्री प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात कंपनीच्या वतीने प्रमुख अधिकारपत्रधारक म्हणजेच कुलमुखत्यारधार म्हणून काम पाहणाऱ्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.Anjali Damania,
तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली असली, तरी या व्यवहाराशी थेट संबंधित असलेल्या पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याच मुद्द्यावरून विरोधकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सत्तेचा गैरवापर होतोय का, कायद्यापेक्षा राजकीय वजन जड ठरतंय का, असे सवाल उपस्थित केले जात असताना अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद शमण्याऐवजी आणखी पेटला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.Anjali Damania,
पुण्यातील या जमीन व्यवहाराबाबत बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलल्याचे दिसून आले. त्यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, संबंधित व्यवहार सुरू असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य पद्धतीने तपासणी करणे अपेक्षित होते. कोणतीही त्रुटी किंवा चुकीची बाब आढळून आली असती, तर त्याच वेळी अधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. अधिकाऱ्यांकडून वेळीच कारवाई झाली असती, तर पुढील साखळी घडामोडी घडल्या नसत्या, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर थेट सरकारी अधिकाऱ्यांवर फोडल्याचा आरोप होत आहे. राजकीय वर्तुळात अजित पवार प्रशासनाची ढाल पुढे करत आपल्या पुत्रावरील आरोपांपासून स्वतःला आणि कुटुंबाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हे वक्तव्य अनेकांना न पटणारे ठरले असून, विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
चूक नसून सुनियोजित फसवणूक
अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची तीव्र शब्दांत खिल्ली उडवत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत उपमा देत म्हटले की, लहान मुलं शाळेत असताना, म्हणजेच कुकूले बाळ असताना, त्यांच्या भांडणात शिक्षकांनी लक्ष द्यायला हवं होतं, असं आपण म्हणू शकतो. पण अजित पवारांच्या वक्तव्याची तुलना त्यांनी अशाच परिस्थितीशी केली आणि थेट सवाल केला की, पार्थ पवार काही कुकूले बाळ नाहीत. त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, या प्रकरणात जी काही कृत्ये झाली आहेत, ती साधी चूक नाही तर सरळसरळ फ्रॉड आहे. एकदा नव्हे, तर सातत्याने कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आले, सप्लीमेंट एलएलपी तयार करण्यात आली, रिझोल्यूशन पास करण्यात आले, खोटा एलओआय मिळवण्यात आला, त्यानंतर अॅडज्युडिकेशन करण्यात आले, विक्री व्यवहार करण्यात आला आणि अखेर ताबाही घेण्यात आला. एखादी व्यक्ती इतक्या टप्प्यांतून हा व्यवहार पूर्ण करत असेल, तर ती चूक नसून सुनियोजित फसवणूक असल्याचे दमानिया यांनी ठामपणे नमूद केले.
सत्ता, पद किंवा वजनाच्या जोरावर पडदा टाकता येणार नाही
अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर अधिक आक्रमक होत, अधिकाऱ्यांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न फेटाळून लावला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर एखाद्या अधिकाऱ्यांना तुमच्या मुलाची चूक दिसत नसेल, तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा. या प्रकरणात अधिकाऱ्यांची चूक नाही, कारण जे घडलं आहे ते स्पष्टपणे दिसणारं आणि दस्तऐवजांमधून सिद्ध होणारं आहे. त्यामुळे प्रशासनालाच दोष देणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या की, आम्हाला जे लढायचं आहे, ते आम्ही लढणारच आहोत. सत्ता, पद किंवा वजनाच्या जोरावर अशा प्रकरणांवर पडदा टाकता येणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक पातळीवर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
Anjali Damania Slams Ajit Pawar Parth Pawar Land Scam Photos Videos Report
महत्वाच्या बातम्या
- White House : व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या आजाराच्या अफवा फेटाळल्या; म्हटले- हस्तांदोलन केल्याने खुणा झाल्या
- 100 वर्षांत महाराष्ट्र विधानपरिषदेने नेमके केले काय??, वाचा परंपरा, चर्चा आणि निर्णयांच्या वारशाचा इतिहास!!
- काँग्रेसने लावली कम्युनिस्टांच्या अखेरच्या गडाला घरघर ही खरी केरळ मधली बातमी!!
- फुटबॉलर लिओनेल मेस्सीला कोलकत्यात आणायचा सगळा डाव उधळला; मम