विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचेही संकेत दिलेत.Anjali Damania
अंजली दमानिया यांनी माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल 245 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या काळात झालेल्या कृषि साहित्याच्या अधिक दराने केलेल्या खरेदीवर बोट ठेवले होते. पण मुंबई उच्च न्यायालयाने ही खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊनच राबवण्यात आल्याचे नमूद करत एकप्रकारे त्यांना क्लीनचिट दिली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेद्वारे आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.Anjali Damania
हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार
अंजली दमानिया म्हणाल्या की, हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी शासनाच्या वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले. या प्रकरणी जे दोन जीआर होते ते वेगवेगळ्या विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हा युक्तिवाद चुकीचा होता. या प्रकरणात कुठेही भ्रष्टाचाराचा उच्चार करण्यात आला नाही. भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही.
मुंडेंना क्लीनचिट मिळाली असे म्हणता येत नाही
परिणामी, धनंजय मुंडे यांन क्लीनचिट मिळाली असे म्हणता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणाला आव्हान देण्याची गरज आहे. हा विषय सुप्रीम कोर्टात मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोकायुक्तांपुढे सुरू आहे. या प्रकरणी कृषी खात्याच्या तत्कालीन सचिव व्ही राधा यांचा अहवालही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनी एकदा नव्हे तर 8 वेळा हे चुकीचे असल्याचा दावा केला होता.
धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत
धनंजय मुंडे यांना सत्यमेव जयते असे म्हणणे शोभत नाही. ते कोणत्याही अंगाने क्लिन अर्थात स्वच्छ नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये. धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाटे कृषीमंत्री झाले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ हे सर्व त्यांच्या पथ्यावर पडले, असेही अंजली दमानिया यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले आहे.
Anjali Damania: Don’t Re-Induct Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!
- Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू
- राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??