विशेष प्रतिनिधी
बीड : Anjali Damania कालच्या मोर्चात ही माणसं स्वतःचं पोळीवर राजकारणाची पोळी भाजून घ्यायला गेले होते. त्यांना संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाहीये एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय. पण ते साफ चुकीचे आहे. त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले कारण जितेंद्र आव्हाड , सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर ही त्या मंचावर होती ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी, गुंडगिरी, खंडणीचे प्रकार सर्वच एक एक बाहेर येत आहे. निया यांनी पण या प्रकरणात उडी घेतली आहे. दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे सारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देणारी माणसं जे स्वतः अशी अनेक कृत्य केली आहे, अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही, म्हणून ही लढाई आहे.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या आंदोलनाची रुपरेषा यावेळी सांगितली. त्या रोज सकाळी 10-12 या कालावधीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असतील. त्याठिकाणी लोक जी माहिती देतील, त्यातील तथ्य शोधून, त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोनच व्यक्तीविरोधात आंदोलन का करण्यात येत आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे. हे दोघेच गुन्हेगार आहेत असं नाही. इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत. पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि कराड याच्यापासून करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एडीआर नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे. तर असं जर असेल तर हे लोक मंत्री म्हणून तिथे जाणार आणि मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार हे मला मान्य नाही, असे दमानिया म्हणाल्या.
Anjali Damania alleges that Awad, Dhas, Kshirsagar are of Munde’s tendency.
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Chennai rape case : चेन्नई रेप केस- पोलिसांनी पीडितेची ओळख उघड केली; निषेधार्थ अण्णामलाई यांनी स्वत:ला चाबकाचे फटके मारले
- Manipur : मणिपूरच्या दोन जिल्ह्यांत गोळीबार, मोर्टार डागले; कुकी-मैतेई यांच्यात पुन्हा हिंसाचार सुरू