विशेष प्रतिनिधी
मुंबई : दुसऱ्या चार्जशीट वरून अनिल देशमुखांच्या मुलांच्या अडचणीत वाढ, त्यांना अटक होणारच असून वसुली प्रकरणातील इतर लाभार्थी सुद्धा ईडी च्या रडारवर आहेत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. Anil Deshmukh’s two sons will be arrested; Other beneficiaries of recovery also on radar: Somaiya
अनिल देशमुखांचे दोन्ही मूल आता आरोपी ठरले आहेत. आरोप पत्रात नाव म्हणजे ईडी केव्हाही त्यांना अटक करू शकते. अनिल देशमुखांचे वकील , जावई , पीए हे सर्व वसुली घोटाळ्यात आरोपी आहेत. अनिल देशमुख यांचे १०० कोटींचे मनी लॉड्रींगचा हिशेब हातामध्ये आलेले आहेत.
त्यात अनेक लाभार्थी आहेत अनिल परब यांचे सुद्धा नाव सचिन वाझेने घेतलं होतं. सर्व लाभार्थ्यांची चौकशी होऊ शकते आणि अजून लाभार्थी वाढ होऊ शकते. मुलांचवअटक पूर्व जमीन होणार नाही. त्यांना अटक होणारच, असे किरीट सोमय्या म्हणाले.