• Download App
    अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीला का हजर राहिले नाहीत? याचें कारण झाले स्पष्ट | Anil deshmukh regarding enquiry about money laundering case

    अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीला का हजर राहिले नाहीत? याचें कारण झाले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैशांचा गैरव्यवहाराबाबत ईडी कडून नोटीस बजावण्यात येत होत्या. यासंदर्भात ते मुंबई उच्च न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. यामागचे कारण देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

    Anil deshmukh regarding enquiry about money laundering case

    अनिल देशमुख म्हणतात की मी ईडीपासून पळत नाही आहे. ते म्हणाले की, मी त्यांच्या कारवाई पासून पळतोय हा गैरसमज आहे. ईडी कडून निःपक्षपातीपणे कारवाई होणार असेल तरच मी त्यांना तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.


    Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या वकिलाला आणि अहवाल लिक करणाऱ्या CBI अधिकाऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


    अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी न्यायमूर्ती नितीन एम जमादार आणि सारंग व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद मांडला. ते म्हणाले की, कुठलाही वैयक्तिक हेतू नसेल अशा लोकांकडूनच देशमुख यांची चौकशी केली जावी. देशमुख यांना जबरदस्तीच्या कारवाई पासून सुरक्षा देण्यात यावी तसेच ईडीने निष्पक्षतेच्या मापदंडाचे पालन करावे अशी मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली. सूडबुद्धीने आणि मनमानीने ही चौकशी काही अधिकाऱ्यांकडून केली जात आहे असा आरोप देशमुख यांच्या वकिलांनी केला. अनिल देशमुख यांच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण व्हावी तसेच माध्यमांना ते वाईट व्यक्ती आहेत असे दाखवण्यात यावे यासाठी हे सर्व केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

    Anil deshmukh regarding enquiry about money laundering case

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?