प्रतिनिधी
मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीला दिलेल्या जबाबातील विधान मागे घेण्यासाठी सचिन वाझेवर तुरुंगात दबाब टाकला जात असल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. आणि हा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आणला जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.Anil Deshmukh pressures Sachin Waze to withdraw reply to ED; Paramvir Singh’s allegation
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात तुरुंगात आहे. १६ वर्षे पोलीस खात्यातून दूर असलेला बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला पोलीस खात्यात पुन्हा सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचना दिली होती,
असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केल्यानंतर सिंग यांनी दुसरा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे याच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात असल्याचे सिंग यांनी ईडीच्या चौकशीत ही माहिती दिल्याचे उघड झाले आहे.
अनिल देशमुख यांनी ३० नोव्हेबर २०२१ रोजी चांदीवाल आयोगच्या ठिकाणी सचिन वाझेची भेट घेतली होती, या भेटीच्या दरम्यान त्याने अंमलबजावणी संचालनालयाला दिलेले त्याचे विधान मागे घेण्यासाठी देशमुख यांनी दबाव आणला होता.
तसेच याच कारणावरून वाझे याच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात आहे, वाझे याची तुरुंगात रोज झडती घेतली जात असल्याचे माहिती कळली आहे, असे परमवीर सिंग यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. त्याच बरोबर मला असे देखील कळले की,
ठाण्याचे पोलीस उपायुक्त हे वाझे हे मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना त्यानी वाझेची भेट घेतली होती, आणि वाझेवर दबाब आणण्यासाठी देशमुख यांनी चांदीवाल आयोगामध्ये त्याची भेट घेतली होती, असेही सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे
Anil Deshmukh pressures Sachin Waze to withdraw reply to ED; Paramvir Singh’s allegation
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : असदुद्दीन ओवैसींच्या कारवर गोळीबार, मेरठहून परतत असताना कारवर 4 राऊंड फायर करून पळून गेले हल्लेखोर
- पंडित नेहरूंचेच परराष्ट्र धोरण चीन धार्जिणे; काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंहांचा हल्लाबोल!!
- Budget Session : मराठीला लवकरच मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
- एटीएसने अपहरण केले; हिंदुत्ववाद्यांविरुध्द दबाव आणला मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार उलटला