विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल, बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी गोळा करण्याची असाइनमेंट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती, असा आरोप सचिन वाझेआणि परमवीर सिंग यांनी केला होता.Anil Deshmukh – Parambir Singh: Pressure on Paramvir Singh to withdraw Deshmukh’s case ?; CBI inquiry into Mumbai Police Commissioner Sanjay Pandey
या केसमध्ये परमवीर सिंग यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे. अनिल देशमुखांवरची केस मागे घ्यावी, असा दबाव मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आणल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी केला होता. या आरोपासंदर्भात संजय पांडे यांची सीबीआयने 6 तास चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती शनिवारी दिली.
हेमंत नगराळे यांना बाजूला करून महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने संजय पांडे यांना नुकतेच मुंबईचे पोलिस आयुक्त नेमले आहे. येत्या 4 महिन्यात संजय पांडे निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर थेट सीबीआयने संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावणे आणि त्यांची 6 तास चौकशी करणे हा महाविकास आघाडी सरकारला धक्का असल्याचे मानले जात आहे.
मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बदली घोटाळा प्रकरण काढताना गोपनीयता कायद्याचा भंग का केला?, याचे उत्तर देण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. उद्या सकाळी 11.00 वाजता ती स्वतः केबीसी सायबर ठाणे मध्ये जाऊन आपले उत्तर दाखल करणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे “फेवरेट” मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची 6 तास सीबीआय चौकशी होणे यातही माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुखांवरची केस मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप संजय पांडेंवर असणे या गोष्टीला कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या देखील खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
Anil Deshmukh – Parambir Singh: Pressure on Paramvir Singh to withdraw Deshmukh’s case ?; CBI inquiry into Mumbai Police Commissioner Sanjay Pandey
महत्त्वाच्या बातम्या
- Fadanavis – NCP – Raut : पोलीस चौकशी विषयी फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी – राऊत बचावात्मक पवित्र्यात!!
- Pawar – ED – Fadanavis – police : पवार जसे ईडीकडे जाणार होते… तसे फडणवीस उद्या पोलिसांत जाताहेत!!
- BHR Fraud : सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची “डबल ढोलकी”??; आरोपी रायसोनींचेही वकील??; व्हेरिफिकेशन नंतर पर्दाफाश फडणवीस
- योगी आदित्यनाथांचा होळीनंतर शपथविधी