• Download App
    पुण्यात भाजपचे नाना पटोलेंविरोधत पोस्टर लावत खुलं आव्हान|An open challenge by putting up posters against BJP's Nana Patole in Pune

    पुण्यात भाजपचे नाना पटोलेंविरोधात पोस्टर लावत खुलं आव्हान

    पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धिरज घाटे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करत त्यांना खुलं आवाहन केलं आहे.An open challenge by putting up posters against BJP’s Nana Patole in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापल आहे.पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले आहे.

    दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.पटोले यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलच आक्रमक झाल आहे. राज्यात विविध ठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.दरम्यान पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धिरज घाटे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करत त्यांना खुलं आवाहन केलं आहे.



    धीरज घाटे यांनी नाना पटोले यांना”नाना आपण पुण्यात कधी येतात ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत.आम्ही स्वागत कसे करतो ते आपले सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जीतूहीनला विचारा”असे म्हणत खुलं आव्हान दिले आहे.

    An open challenge by putting up posters against BJP’s Nana Patole in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा