• Download App
    फडणवीसांविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न, पण पवारनिष्ठांचा "अँटी फडणवीस नॅरेटिव्ह" उद्ध्वस्त!!|An attempt to inflame the atmosphere against Fadnavis, but the "anti-Fadnavis narrative" of Pawar loyalists is destroyed!!

    फडणवीसांविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न, पण पवारनिष्ठांचा “अँटी फडणवीस नॅरेटिव्ह” उद्ध्वस्त!!

    महाराष्ट्रातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने काय साध्य केले असेल??, तर फडणवीसांविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न, पण “अँटी फडणवीस नॅरेटिव्ह” उद्ध्वस्त!!, हे साध्य केले आहे.An attempt to inflame the atmosphere against Fadnavis, but the “anti-Fadnavis narrative” of Pawar loyalists is destroyed!!

    देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या महायुतीने 1369 ग्रामपंचायत विजय मिळवला, तर ठाकरे – पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला फक्त 503 ग्रामपंचायती टिकवता आल्या.

    महायुतीत भाजप 716 अजितदादा गट 406 एकनाथ शिंदे गट 247 = 1369, तर महाविकास आघाडीत काँग्रेस 205 शरद पवार गट 185 ठाकरे कडे 113 = 503 अशी आकडेवारी राहिली.



    अँटी फडणवीस नॅरेटिव्ह उद्ध्वस्त

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण निमित्ताने महाराष्ट्रात ठाकरे – पवारांच्या गटांनी देवेंद्र फडणवीस आणि विरुद्ध वातावरण पेटवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मराठी माध्यमांनी देखील त्याला खूप हवा दिली, पण प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मात्र पवारनिष्ठांनी उभा केलेला “अँटी फडणवीस नॅरेटिव्ह” जनमताने उद्ध्वस्त केला.

    त्यातही मराठा आंदोलकांनी सिलेक्टिवली गाव बंदी करून भाजप – शिंदे गट यांच्या नेत्यांना गावात येण्यापासून रोखले. काही ठिकाणी अजितदादांच्या नेत्यांना प्रतिबंध केला. खुद्द अजित पवारांना माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पूजनाला जाण्यापासून रोखले, पण ही गाव बंदी देखील प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानावर प्रतिकूल परिणाम करू शकली नाही. राज्यात तब्बल 74 % मतदान झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या महायुतीला प्रचंड बहुमत देत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातही देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सिद्ध झाले.

     जरांगे पाटलांकडूनही फडणवीस टार्गेट

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतः मनोज जरांगे पाटलांनी देखील उपोषणादरम्यान एका उपमुख्यमंत्र्यालाच काड्या करायची भरपूर सवय आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनाच उद्देशून केली होती. मराठा आंदोलकांचा देवेंद्र फडणवीसांवरच विशिष्ट राजकीय हेतूने रोष निर्माण केला गेला होता. भाजप – शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या नेत्यांना गावबंदी होती. पण शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे सगळे नेते वेगवेगळ्या गावांमध्ये फिरू शकत होते. यातून मराठा आंदोलका आंदोलनाला शरद पवारांचीच फूस असल्याचे उघड दिसत होते.

    त्याचवेळी खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार बाकी सगळ्या नेत्यांना वगळून देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे ब्राह्मण नेते ग्रामीण भागात चालणार नाहीत. अजित पवारांना शरद पवारांपासून फोडून आणि एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपासून फोडून देवेंद्र फडणवीस यांनी चूक केली. त्याची शिक्षा महाराष्ट्राचा मतदार फडणवीसांना देईल, अशा धमक्याही अनेक नेते देत होते.

    फडणवीसांचेच नेतृत्व अव्वल

    पण प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून हा पवारनिष्ठ “अँटी फडणवीस नॅरेटिव्ह” पूर्ण उद्ध्वस्त झाला. खुद्द बारामती सारख्या तालुक्यात अजितदादांनी शरद पवारांचा गट ग्रामपंचायत निवडणुकीतून पुरता उद्ध्वस्त केला. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती हे गेल्या 50 वर्षांमधले समीकरण अजितदादांनीच संपवून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या भाजप – एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मतदारांनी भरघोस मते देऊन स्वीकारली.

    महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची नाडी शरद पवारच अचूक ओळखतात, हा मराठी माध्यमांचा लाडका सिद्धांतही ग्रामीण भागातील मतदारांनी पूर्णपणे मोडून काढला.

    2359 ग्रामपंचायतीची निवडणूक ही केवळ झलक होती. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांची ती लिटमस टेस्ट होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही लिटमस टेस्ट डिस्टिंक्शनचे मार्क्स मिळवून जिंकली आहे.

    An attempt to inflame the atmosphere against Fadnavis, but the “anti-Fadnavis narrative” of Pawar loyalists is destroyed!!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस