विशेष प्रतिनिधी
अमरावती : Amravati Horror अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.Amravati Horror
या प्रकरणात काही गंभीर दावेही करण्यात आले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आरोपीने तब्बल १८० तरुणींचे शोषण केले असून ३५० अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. या दाव्यांची सत्यता तपासाचा भाग असून पोलिसांनी या सर्व बाबींची चौकशी सुरू केली आहे.Amravati Horror
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेत आहे.
अनिल बोंडे यांनी आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचाही आरोप केला आहे. तसेच हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून यामागे मोठे जाळे असू शकते, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्रुप तयार करून हे प्रकार चालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा तपासला जात आहे. मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. काही डेटा डिलीट करण्यात आला असला तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने गेल्या एक वर्षापासून हे प्रकार सुरू असल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच सात पीडित तरुणींची नावेही समोर आल्याची माहिती आहे. पोलिस आता संभाव्य पीडितांची ओळख पटवणे, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि संपूर्ण जाळ्याचा तपास करणे यावर भर देत आहेत.
हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Amravati Horror: Mohammad Ayaz Arrested for Exploiting 180 Women
महत्वाच्या बातम्या
- Bihar Govt : मंत्री म्हणाले- 15 एप्रिलला बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल; मुख्यमंत्री निवासस्थानी जदयूची एक तास बैठक
- डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यात विविध ठिकाणी अभिवादन आणि सामाजिक उपक्रम
- PM ModI : मोदी महिलांना म्हणाले- मी गृहस्थ नाही, पण मला सर्वकाही माहिती; आमच्या योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या
- दीर्घकाळाचे राजकीय स्वप्न साकार; हिंदी पट्ट्यातल्या बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भाजपचे सम्राट चौधरी!!