Eknath Shinde : ”उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती, भाजपसोबत सरकार स्थापन करायचे होते”
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विधान परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांची माफी मागितली होती. आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करायचे आहे असे सांगितले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी या विषयावर आपले मत बदलले होते.