Chief Minister Fadnavis : ‘महापारेषणची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महापारेषण प्रलंबित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.