पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये फटका खाल्ल्यानंतर अजितदादा बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषदेत “शांततेत” प्रचार!!
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत करत आहेत
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत करत आहेत
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच कणकवली पंचायत समितीतील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यातील वरवडे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांच्या जलाशयांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या धरणांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प (फ्लोटिंग सोलर) उभारून महाराष्ट्राला हरित ऊर्जेत आघाडीवर आणण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा शिवसेनेत परत येण्याचे संकेत दिले आहेत का अशी चर्चा होऊ लागली आहे. शिवसेना माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हत तर घर सोडणं होतं, असे ते म्हणाले आहेत.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सतत होणाऱ्या सुनावणीच्या पुढे ढकलण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळावर सरन्यायाधीशांचे स्वागत करतानाचे फोटो शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राऊत संतापले.
ठाकरे सेनेला मुंबईत नको भाजपची साथसंगत; पण चंद्रपुरात हवी सत्तेसाठी सोबत!!, अशी ठाकरे सेनेची दुहेरी राजकीय भूमिका आज समोर आली.
भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस : महापालिका टू जिल्हा परिषद व्हाया दावोस एक राजकीय प्रवास!!, अशाच शब्दांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या महिनाभरातल्या कर्तृत्वचे वर्णन करावे लागेल.
अंगार अजूनही पेटता आहे… विचार अजूनही जिवंत आहेत!!, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या सुरवातीलाच सूचक सोशल मीडिया पोस्ट केली.
दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026 मध्ये सहभागी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी इथून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली आहे तसेच राज्याच्या कोणत्या भागात व कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक आली आहे, यांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नाशिक : 29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या […]
29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. पण त्या पलीकडे जाऊन महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, पण त्यात अजितदादांचा सहभाग नगण्य असेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच निर्णायक भूमिका बजावतील.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही.
महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेर पर्यंत १६ गिगा वॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या ५६ व्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्रात ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटी रुपयांचे ८१ सामंजस्य करार झाले. यातून ४२ लाख रोजगार निर्माणहोणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना डिसेंबरचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींना डिसेंबर २०२५ चा लाभ मतदानापूर्वीच खात्यात जमा होणार आहे. तसेच तांत्रिक चुकांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी पोलंडला कठोर आणि स्पष्ट संदेश देत म्हटले की, दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता (झिरो टॉलरन्स) ठेवावी. भारताच्या शेजारी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी संरचनेला प्रोत्साहन देऊ नये.
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय कंपन्यांशीच दावोस मध्ये जाऊन करार केल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांनी केला होता. प्रत्यक्षात युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांशी महाराष्ट्राने तिथे करार केले.
केरळमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्रातले नेते आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तिरुअनंतपुरम मध्ये जाऊन एक वेगळीच भाजप सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) वेगळीच राजकीय खळबळ माजली. अशी सूचना करून रामदास आठवले यांनी अशी सूचना करून कम्युनिस्टांना “गुगली” टाकली, की भाजपला “बाउन्सर” टाकला??, या विषयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
भारतीय स्त्रीशक्ती जागरणच्या वतीने नुकताच ‘सावित्री महिला जागृती मेळावा’ घेण्यात आला. नवीन मराठी शाळेच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात प्रेरणादायी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव सुनिती पारुंडेकर उपस्थित होत्या.
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड – पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली.
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सह-प्रभारी असतील. केरळ व्यतिरिक्त, तावडे चंदीगड महापौर निवडणुकीचे निरीक्षक देखील असतील.
काँग्रेसवाले हरले तरी भांडणे आणि जिंकले तरी भांडणेच!!, असला प्रकार त्या पक्षातून समोर आलाय. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झाला. त्यांनी ठाकरे बंधूंशी फारकत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली. पण ती दोन्ही पक्षांना राजकीय दृष्ट्या पचली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे फक्त 24 नगरसेवक निवडून आले. २२७ पैकी 24 हा परफॉर्मन्स बघून काँग्रेसचे मुंबईतले नेते भडकले.