आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.