शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट; यातून तरी साध्य होणार का “राजयोग”??, राजकीय वर्तुळात चर्चा!!
एरवी स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट मिळाली आणि त्याबरोबर perfect political timing साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. देव देव करण्यापासून दूर राहिलेल्या शरद पवारांना ध्यान धारणेची पुस्तके भेट दिली आणि ती त्यांनी स्वीकारली याचे बरेच राजकीय अर्थ मुंबईच्या राजकीय वर्तुळात काढले गेले. शरद पवारांनी आत्तापर्यंत “राजयोग” साधायचे बरेच प्रयत्न केले, पण ते सगळे भौतिक पातळीवरचे होते. आता ध्यानधारणेने द्वारे तरी त्यांना या वयात “राजयोग” साध्य होईल का??, असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येतोय.