केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसद भवनात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारने संसदेत वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारी अधिसूचना जारी केली आहे. ही काय गोष्ट आहे? यामागे कुणाचे डोके आहे? माझे खासदार संसदेत जाऊन वंदे मातरम म्हणतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना बाहेर काढून दाखवावे, असे ते म्हणाले. भाजपचे हिंदुत्त्व ढोंगी आहे. भाजपचे मुंह में राम बगल में अदानी, असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. अदानी हा शब्द कॉन्ट्रॅक्टरचा प्रतीक झालाय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कुंभमेळ्याचे कारण सांगून नाशिकमध्ये वृक्षतोडीचा घाट घातला जातोय. ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातेय, असा आरोपही त्यांनी केला.