• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुराळा उडाला. आता दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही आणि झाले तर ते आपल्या अटी शर्तींवर होत नाही, हे लक्षात येताच आम्ही काय शस्त्र टाकून शरणागती पत्करायला जात नव्हतो, असा राणा भीमदेवी थाट पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आणला. जयंत पाटलांनी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्याला वेगळ्या शब्दांनी दुजोरा दिला, पण दोघांनीही अजित पवारांची शपथ वाहून विलीनीकरण करण्याचा आग्रह अजित पवारांचाच होता, असा वारंवार दावा केला

    Read more

    केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

    Read more

    केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, देवेंद्र फडणवीसांनी उलगडले तपशील!!

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

    Read more

    Rohit Shetty : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर 4 राउंड गोळीबार; मुंबईत याच ठिकाणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे

    महाराष्ट्रातील मुंबईत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर 4 राऊंड गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि फॉरेन्सिक पथके त्यांच्या घरी पोहोचली. रोहित शेट्टी मुंबईतील जुहू परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत.

    Read more

    पवारांच्या कुटुंबातला सत्तासंघर्ष सासरा – सून, नणंद – भावजय यांच्यातला; पण खापर मात्र पटेल, तटकरे, अरोरा आणि भाजपवर!!

    पवारांच्या कुटुंबातला सत्तासंघर्ष सासरा – सून, नणंद – भावजय यांच्यातला; पण त्याचे खापर मात्र प्रफुल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा आणि भाजपच्या नेत्यांवर!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आणि “पवार बुद्धीने” ग्रासलेल्या नेत्यांमधून आणि पत्रकारांकडून समोर आला.

    Read more

    Sunetra Pawar : जबाबदारी स्वीकारताना मन भरून येतंय; दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. पती आणि राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ओढवलेल्या दु:खाच्या सावटाखाली असतानाच, त्यांनी “दादांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास पुढे नेणार,” असा दृढ निश्चय व्यक्त केला आहे. ही जबाबदारी स्वीकारताना त्यांचे मन भरून आले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.

    Read more

    Anil Deshmukh : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजितदादांची शेवटची इच्छा; दादा, सुप्रिया सुळे अन् तटकरेंमध्ये बैठक झाली होती, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी सगळे ठरले होते. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळेंची बैठक झाली होती. जयंत पाटलांच्या घरी पहाटेपर्यंत बैठका चालल्या,” असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अजितदादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी घातली.

    Read more

    Amol Mitkari : पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत; अमोल मिटकरींचं वक्तव्य; म्हणाले- राजकारणापेक्षा पक्ष सावरणे गरजेचे

    मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

    Read more

    Raj Thackeray : पाटील चालेल पण पटेल नको, राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या अध्यक्षपदावर टोला; प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता निशाणा

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीच्या वेळी वातावरण भावनिक होते. कार्यकर्त्यांकडून अजित पवार अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या सोहळ्यास उपस्थित होते. या शपथविधीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

    Read more

    सगळ्या “डावांचे” “अडथळे” पार करत संपूर्ण पवार कुटुंबांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी!!

    आजच्या 31 जानेवारी 2026 रोजीच्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी झाला.

    Read more

    शरद पवारांचा “डाव” उधळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!, हे राजकीय वास्तव आज 31 जानेवारी 2026 रोजीच्या प्रचंड घडामोडीनंतर समोर आले.

    Read more

    सुनेत्रा पवारांनी आपल्याला विचारलेच नाही, असे खुद्द शरद पवारांनी सांगितल्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेत पवारांच्या भेटीला; पण त्याचवेळी पटेल आणि तटकरे मुंबईत सुनेत्रा पवारांच्या भेटीला!!

    सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बद्दल आपल्याला काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी तो त्यांच्या अधिकारात घेतलेला निर्णय आहे.

    Read more

    महाराष्ट्राच्या राजकारणातली ही तर खरी “क्रांती”; मुंबईत ठाकरे “नॉन प्लस”; उर्वरित महाराष्ट्रात पवार “नॉन प्लस”!!

    2026 चा जानेवारी महिना महाराष्ट्रातल्या राजकारणात खरी “क्रांती” घेऊन आला. कारण याच महिन्यात मुंबईतल्या राजकारणातून ठाकरे “नॉन प्लस” झाले, तर उर्वरित महाराष्ट्रातून पवार नॉन प्लस झाले.

    Read more

    Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, राष्ट्रवादीने काय करावे हा त्यांचा निर्णय- शरद पवार

    सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जो निर्णय घेण्यात आला तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मी काही भाष्य करणार नाही, असे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    Jayant Patil : अजित पवार NCP एकीकरणासाठी सकारात्मक होते; जयंत पाटलांचा दावा- अनेक गुप्त बैठका झाल्या

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र यावेत, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच एकीकरणाच्या मुद्द्यावर इतक्या ठाम शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

    Read more

    Ajit Pawar : सरकारचा मोठा निर्णय; अजित पवार विमान दुर्घटनेच्या CID चौकशीचे आदेश; अपघातस्थळावर प्रवेश बंदी

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 तारखेला, बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

    Read more

    Sharad Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय; दूषित झालेल्या नीरा नदीची केली पाहणी

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली.

    Read more

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार; पद स्वीकारण्यास होकार; राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज महत्त्वाची बैठक

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, अशी चर्चा सुरू झाली असून यात सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे समजते. तसेच शनिवारीच सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

    Read more

    अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू!!; देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे सूचक उद्गार!!

    अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सूचक पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ठामपणे उभे राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    Read more

    सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाला होकार; उद्या सायंकाळी शपथविधी; राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा थंडावली; सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पिछाडीवर!!

    अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिला. त्यामुळे उद्या दुपारी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल आणि सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील. पण त्या “मूळच्या पवार घरातल्या” नसतील, तर त्या “बाहेरून पवारांच्या घराण्यात आलेल्या” असतील!!

    Read more

    राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!

    राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!

    Read more

    देवेंद्र फडणवीसांशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, पण…; प्रफुल्ल पटेलांची माहिती; Between the Lines काय??

    अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना मिळणार, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी चालवली असताना प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते

    Read more

    दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा; पक्षाच्या नेतृत्वासाठी देखील खेचाखेच!!

    दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा आणि नेतृत्वाची देखील खेचाखेच!!, हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले राजकीय वास्तव आता उघड झाले.

    Read more

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खानच्या मालिकेविरुद्धची याचिका फेटाळली

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून धक्का बसला. न्यायालयाने आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात दाखल केलेली त्यांची याचिका फेटाळून लावली. या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार आपल्याकडे नाही, असे न्यायालयाने म्हटले.

    Read more

    Maharashtra ZP : ZP आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल:7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 तारखेला होणार मतमोजणी

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

    Read more