• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Supriya Sule : सुप्रिया सुळे म्हणाल्या- भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही? व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही गंभीर आत्मचिंतन केले पाहिजे, असे त्या म्हणाल्यात.

    Read more

    Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर; विकसित महाराष्ट्र 2047 कडे मोठी झेप; आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी

    राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाची स्थापना यांसारख्या मुद्द्यांसह ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकॅडमी उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    एमपीएससीची भरती प्रक्रिया सुलभ करायचा फडणवीस सरकारचा निर्णय; संवर्गांची संख्या सुद्धा ५३ वरून १५३ वर!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.

    Read more

    Ladki Bahin : E-KYC करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी; लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसोबत जळगावात धक्कादायक प्रकार

    महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली अशी मागणी करण्यात येत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा- गुन्हे कसे मागे घेत नाहीत, बघतोच; विखे पाटलांवरही हल्लाबोल

    मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तर राज्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभे करू आणि सरकारला गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. गुन्हे कसे मागे घेत नाहीत, मी बघतोच.” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

    Read more

    Nana Patole : नाना पटोलेंचा आरोप- अशोक खरात हा सरकारचाच माणूस; SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाले – मी एकदाच ऑपरेशन केले

    “मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

    Read more

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- महिला आरक्षण कायद्याला राजकीय शस्त्र बनवू नका; बिलासोबत सीमानिर्धारण प्रक्रियेत घाई केल्याने राज्यांचे लोकशाही संतुलन बिघडेल

    काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, महिला आरक्षण कायद्यात होणाऱ्या सुधारणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाऊ नये, जेणेकरून संघराज्य कमकुवत होऊ नये आणि संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये.

    Read more

    “आशाताई” – दि लास्ट एम्परर; राज ठाकरेंची भावपूर्ण श्रद्धांजली

    अष्टपैलू सूर आज हरपला. आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अतिशय कलात्मक आणि तरल भाषेत आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजलीतून त्यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गायनाचे सूत्र जागतिक कलेशी जोडले.

    Read more

    चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज; आशाताईंच्या स्वरांची सोबत कायम राहील!!

    भारतीय संगीत विश्वातला अष्टपैलू सूर आज हरपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    Read more

    मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावणाऱ्या आशाताई!!

    अष्टपैलू सूर हरपला. आशा भोसले यांनी आज एक्झिट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून आशाताईंच्या आठवणी जागविल्या.

    Read more

    Supreme Court :सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- मतदान करणे-लढणे मूलभूत अधिकार नाही; हा कायदेशीर अधिकार, निवडणूक लढण्यासाठी पात्रता अटी आवश्यक

    सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सांगितले की, मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसून, वैधानिक अधिकार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे अधिकार केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंतच अस्तित्वात आहेत.

    Read more

    Asha Bhosle : अष्टपैलू सूर हरपला!!

    वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.

    Read more

    Aditi Tatkare : महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा निर्णय; विभागात 11,512 पदांना हिरवा कंदील; प्रलंबित प्रक्रिया मार्गी लागणार

    राज्यातील महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Anjali Damania : अशोक खरातच्या जीवाला धोका, फाईल बंद करण्यासाठी काहीही होऊ शकतं; जेलमध्ये सुरक्षा देण्याची दमानियांची मागणी

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

    Read more

    CM Fadnavis : शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही; पवारांचे राज्यासाठी योगदान मोठे, पण त्यांचा पिंड निधर्मी; CM फडणवीसांची टीका

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे मला दुःख वाटते,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दाव्यांचा समाचार घेतला. नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर भाष्य केले.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- महिलांना आरक्षण देणे हीच महात्मा फुलेंना खरी आदरांजली, ज्योती-सावित्री जि. प. शाळेचे उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- बारामतीत प्रचाराला जाणार; निवडणूक अजित पवार यांच्या कामावर होत आहे

    “बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते.

    Read more

    Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादचा केंद्रीय यंत्रणेकडून गोपनीय तपास:; बड्या कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू

    कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण गंभीर वळणावर गेले असून केंद्राकडून उच्चस्तरीय तपास सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

    Read more

    Sunetra pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याची उत्सुकता, अजित पवार यांचा विक्रम मोडणार!

    बारामती विधानसभा मतदारसंघ हा १९६७ पासून पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रभावी विरोधक नसल्याने त्या किती मताधिक्याने विजयी होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर असून, २०१९ मध्ये त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजय मिळवला होता. हा विक्रम सुनेत्रा पवार मोडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Read more

    वारकरी संप्रदायात घुसले होते अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!!

    वारकरी संप्रदायात 60 % लोक प्रतिगामी घुसलेत. 40 % लोक वारकरी संप्रदाय विषयी योग्य मांडणी करतायेत बाकीचे 60 % लोक चुकीची मांडणी करतायेत, अशा आशयाचा लेख लिहून शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या समर्थनासाठी बाहेर आले.

    Read more

    ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा; शिक्षणाचा नवा दीपस्तंभ!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पैतृक गाव पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन संपन्न झाले.

    Read more

    Nashik : मंत्री महाजन म्हणाले- कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले; नाशिकच्या आयटी कंपनीत पैसे, नोकरीचे आमिष, मुली-मुलांचे धर्मांतर

    नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

    Read more

    CM Fadnavis : भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

    Read more