दैवी अवतार असल्याचे सांगून अशोक खरात कडून महिलांवर बलात्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत हादरवणारी माहिती
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.