• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Anjali Damania, : पार्थ पवारांवर FIR झाला की अजित पवारांचा राजीनामा नक्की; अंजली दमानियांचा दावा; नाशिक तपोवन वृक्षतोडी प्रकरणी महाजनांवर टीका

    मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे.

    Read more

    Nitin Gadkari : गडकरी म्हणाले- एका वर्षात टोल बूथ संपतील; लोकसभेत सांगितले- बॅरियर-लेस प्रणाली लागू होईल; 10 ठिकाणी प्रायोगिक प्रकल्प सुरू

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, पुढील एका वर्षात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होईल. त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक, बॅरियर-लेस टोल प्रणाली लागू केली जाईल.

    Read more

    Revenue Department, : फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; डिजिटल सातबाऱ्याला मान्यता, तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली

    राज्याच्या महसूल विभागात ‘डिजिटल क्रांती’ घडवून आणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे डिजिटल सातबाऱ्याला (Digital 7/12) कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्यासाठी तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज उरलेली नाही. या निर्णयामुळे नागरिकांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची भासणार नाही.

    Read more

    Gopinath Munde : राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाइन लाभ, महाडीबीटी पोर्टलवर करता येणार अर्ज

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन मिळणार आहे. यापूर्वी हा लाभ केवळ ऑफलाइन मिळत होता. पण आता नव्या निर्णयानुसार तो ऑनलाइन मिळेल. त्याचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळेल.

    Read more

    Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे म्हणाले – वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत?

    भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करत पर्यावरणवाद्यांवर तिखट हल्ला चढवला आहे. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेली बकरी कापण्याला विरोध करताना कधीच दिसत नाहीत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

    Read more

    पुणे – नाशिक थेट अति जलद रेल्वे, पण आता नव्या मार्गाने; पुणतांबा आणि अहिल्यानगरचाही मार्गात समावेश

    पुणे आणि नाशिक या शहरांना जोडणारी थेट रेल्वे गाडी अजून नाही. पुणे ते नाशिक अशी थेट अति जलद रेल्वे दृष्टीपथात आली असून ती नव्या मार्गाने सुरू करण्याचे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात लेखी उत्तरात केले.

    Read more

    जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव??

    जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने जमीन घोटाळ्यातल्या संशयित पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव अजित पवारांनी आखला आहे का??, असा सवाल आता तयार झाला आहे.

    Read more

    CM Fadnavis : वृक्षतोड व्हावी असे कुणाचेही मत नाही; पर्यावरण व कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असे आमच्यापैकी कुणाचेही मत नाही. या प्रकरणी अधिकाधिक झाडे वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी पर्यावरण व कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे ते म्हणालेत.

    Read more

    Uddhav Thackeray : केंद्राने ‘पेगासस’चे नाव बदलून ‘संचार साथी’ केले, उद्धव ठाकरे यांचा आरोप

    स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर जनर ठेवावी, असे ते म्हणालेत.

    Read more

    गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ; क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

    Read more

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानीला अटक; पार्थ अजून मोकळाच!!

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात पोलिसांनी शितल तेजवानीला मुख्य आरोपी बनवले असून तिला आज अटक केली पण पार्थ पवार अजून मोकळाच राहिला. मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची या आधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई केली.

    Read more

    Uddhav Thackeray : EC अन् न्यायालयावर न बोललेलेच बरे; उद्धव ठाकरे यांचे हायकोर्टाच्या आदेशावर भाष्य

    निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा मोजक्या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.

    Read more

    पवार काका – पुतण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; बीडमध्ये तुफान दगडफेक!!

    शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार राडा झाला.

    Read more

    22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका; सगळ्यांचाच निकाल पुढे ढकलला!!

    22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका बसला. कारण सर्व नगरपरिषदा आणि नगरपालिकांचा निवडणूक निकाल मुंबई हायकोर्टाने पुढे ढकलला. आज 2 डिसेंबरला मतदान होऊन उद्या 3 डिसेंबरला निकाल लागणे अपेक्षित असताना निकालाची तारीख आता 21 डिसेंबर वर गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.

    Read more

    वंदेमातरम वरच्या चर्चेवर राहुल गांधींचे No comments; पण पत्रकारांशी कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा!!

    राष्ट्रीय अभिमानाचे गीत वंदे मातरम वरच्या चर्चेवर राहुल गांधींचे No comments, पण पत्रकारांशी कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा!!, असे चित्र संसदेच्या आवारातून आज समोर आले.

    Read more

    राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; आदित्य प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

    विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

    Read more

    CM Fadnavis : निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय चुकीचा, मुख्यमंत्र्यांची EC वर टीका; शिंदेंची भेट न झाल्यावरही खुलासा

    राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली. तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केले.

    Read more

    Prithviraj Chavan : महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधानपदी- पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्वीटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण

    अमेरिकेत सध्या गाजत असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ची माहिती बाहेर आल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. या राजकीय उलथापालथीत कदाचित येत्या महिनाभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल,” असे सूचक आणि खळबळजनक विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आणि सोशल मीडियावरील एका ट्विटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे, पवार यांच्यासह तब्बल 20 नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये; राज्य निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

    राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांतच चढाओढ दिसून आली. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या आणि टीकाटिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू असताना मतदारांना प्रलोभने देणारी महायुतीतील बड्या नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह एकूण २० जणांच्या भाषणांची निवडणूक आयोगाकडून तपासणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.

    Read more

    म्हणे, मराठी माणूस पंतप्रधान!!, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला सुद्धा का सोडावीशी वाटली पुडी??

    महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना मध्येच मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या बाता सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याने ही पुडी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत सोडली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या Epistine files चा हवाला देऊन डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्याचे पडसाद भारतातून उमटून मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असा बादरायणी संबंध जोडला.

    Read more

    निवडणूक स्थगित करण्यावर फडणवीसांचा आक्षेप; रवींद्र चव्हाणांचे निवडणूक आयोगाला पत्र

    राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ताबडतोब निवडणूक आयोगाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली.

    Read more

    फडणवीसांची कुणावरही नाही टीका; युती तुटायची वाट बघणार्‍यांनो, डोळे उघडून बघा!!

    महाराष्ट्रातल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत महायुतीतले सगळे घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांनी विरोधात उभे राहिले

    Read more

    युगेंद्र पवारांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे डेकोरेशन; सुप्रिया सुळे यांनी केले फोटो शेअर!!

    एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे मुंबईत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा हाय प्रोफाईल विवाह सोहळा निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.

    Read more

    22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या; पण विरोधकांकडून साधा आवाजही नाही!!

    महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने वेगवेगळी कायदेशीर कारणे देऊन महाराष्ट्रातल्या 22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या.

    Read more

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले- केवळ राजकारण नाही, तर मलाच संपवण्याचा डाव, नगरपरिषद निवडणूक माझ्यासाठी महत्त्वाची, गडबड करू नका

    विरोधक आता केवळ माझे राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागले आहेत. मी काम करण्याच्या लायकच राहिलो नाही, तर तुमचे काम कोण करणार? अशा कठीण प्रसंगी तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार?” असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीकरांना अत्यंत भावनिक साद घातली आहे. परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

    Read more