विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांचा अपघात होता की घातपात यावरून अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्सचे सत्य समोर येईलच, पण त्याचवेळी दादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे.Amol Mitkari
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले, ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण! आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व ‘लवकरच’ विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती, अशी मागणी त्यांनी केली आहे.Amol Mitkari
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार व अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांना हात घातला होता. त्यात त्यांनी विमान कंपनीवर देखील आरोप केले आहेत.
विमान अपघात तपासासाठी रोहित पवार घेणार खासगी गुप्तहेरांची मदत
सध्या रोहित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी ते हवाई क्षेत्रात वैमानिक किंवा इतर पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तज्ज्ञांकडून माहिती गोळा करून अपघाताची शक्यता, तांत्रिक बाबी आणि नियमांचे पालन झाले होते का, याचा अभ्यास ते करत आहेत. अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल येण्यास विलंब होत असल्याने त्यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे.
तसेच अपघाताचा अधिकृत चौकशी अहवाल यायला अजून वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र हा अहवाल लवकर मिळावा आणि अपघातामागील सत्य स्पष्ट व्हावे, यासाठी रोहित पवार यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे.
‘Where Were the Pilots?’: Amol Mitkari Demands CCTV Probe in Ajit Pawar Crash
महत्वाच्या बातम्या
- बंजारा समाजातील मान्यवरांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन गौरव
- महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर जर शरद पवार राज्यसभेवर; तर पाणी फेरणार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर!!
- PM Modi : मोदी म्हणाले- हे बजेट मजबुरी नाही, ‘आम्ही तयार आहोत’वाला क्षण; 38 देशांशी FTA वर चर्चा सुरू
- शंकर अण्णा धोंडगेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मराठवाड्यात पक्षाला बळकटी