- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीसाठी मुंबईतून रवाना झाला आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत.
- नक्षलवाद आणि माओवादाविरोधात केंद्र सरकार कठोर भुमिका घेणार असून, याबद्दल एक नवी योजना आखण्याच्या तयारीत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावी सहकारी या विधानानंतर त्यांचा हा दिल्ली दौरा होणार आहे.नक्षलवादाच्या मुद्द्यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये खासगीत काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्धा तास खासगीत चर्चा झाली होती. Amit Shah Uddhav Thackeay Visit: Amit Shah’s meeting: Chief Minister Uddhav Thackeray leaves for Delhi; Will Uddhav Thackeray-Amit Shah be ‘future colleagues’?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शासकीय निवासस्थान वर्षाहून ते दिल्लीला जाण्यासाठी भल्या सकाळीच रवाना झाले आहेत. दिल्लीत सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे.
अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित असतील. बैठकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालेल.
नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज 26 सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील.
मुख्यमंत्र्यांची अमित शहांशी वैयक्तिक चर्चा होणार का?
मराठा आरक्षण आणि अन्य महत्वाच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी होते आहे. गेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींशी जवळपास अर्धा तास व्यक्तीगत चर्चा केल्याने त्यांची दिल्ली वारी बरीच चर्चेत राहिली.
सध्या पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी उद्धव ठाकरेंचा व्यक्तिगत संवाद होतो का ? याबाबत उत्सुकता असेल. मुख्यमंत्री बैठकीनंतर दुपारी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
Amit Shah Uddhav Thackeay Visit: Amit Shah’s meeting: Chief Minister Uddhav Thackeray leaves for Delhi; Will Uddhav Thackeray-Amit Shah be ‘future colleagues’?
महत्त्वाच्या बातम्या
- UNGA मधील मोदींचे संपूर्ण भाषण : संयुक्त राष्ट्रांत पंतप्रधानांनी दहशतवाद, कोरोना आणि अफगाणिस्तानसह या मुद्द्यांवर मांडले मत! वाचा सविस्तर…
- तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला
- पालघरमधील प्रकार, दलितांच्या अंतयात्रेच्या वेळी गोंधळ करणाऱ्या तीन लोकांना अटक