नाशिक : कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली. Amit Shah
कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या परिसराच्या जीर्णोदराचे भूमिपूजन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महायुतीने त्यांच्यासाठी कृतज्ञता मेळावा घेतला. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले. पण त्या दीड वाक्यातूनच ऑपरेशन टायगरचे सगळे रहस्य उलगडले.
शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे
शिवसेनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे नाव त्यांनी घेतले आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या आधी शिंदे गट असे बोलावे लागायचे पण आता कुठला गट उरलाच नाही सगळी शिवसेना एक झाली त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नाव शिवसेनेचे अध्यक्ष असे घेतले, असा खुलासा अमित शाह यांनी केला. त्यामुळे ठाकरे सेनेच्या फुटलेल्या सहा खासदारांचे राजकीय आश्रयस्थान आणि रहस्य उलगडले.
फडणवीस यांचे भाषण आहे
याच मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणे झाली. यातून एकनाथ शिंदे यांनी सूचक पद्धतीने सहा खासदारांच्या बंडाची माहिती सांगितली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी कुठला उच्चार सुद्धा केला नाही. किंबहुना ऑपरेशन टायगर होण्यापूर्वी ते ऑपरेशन सुरू असताना आणि नंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी कुठलेही भाष्य केले नाही. ते बोलले ते सूचक पद्धतीनेच. पण प्रत्यक्ष ऑपरेशन टायगर सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रम केले, पण त्यांनी त्या ऑपरेशन बद्दल चकार शब्द उच्चारला नाही.
शाह + फडणवीस + शिंदेंचा एकाच गाडीतून प्रवास
आज अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही अमित शाह यांच्याच गाडीतून अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात पोहोचले. तिथे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर कृतज्ञता मेळाव्याच्या स्थानी आले. तिथे तिघांनीही भाषणे केली. पण अमित शाह यांनी फक्त दीड वाक्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या बंडखोरीचे रहस्य उलगडले. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जो पक्ष आहे तो अखंड शिवसेना आहे आता दुसरा कुठलाही गट उरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये जाहीर करून टाकले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांनी पूर्ण बेदखल केले.
– राज ठाकरेंचे आरोप बेदखल
बाकी अमित शाहांना २०२९ मध्ये पंतप्रधान बनायचे आहे म्हणून त्यांनी आतापासून तयारी करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यांनी आणखी काही पक्ष फोडले ही सगळी त्यांची पंतप्रधान बनायची तयारी आहे असा आरोप राज ठाकरे यांनी आजच जाहीर मेळाव्यामध्ये केला. पण अमित शाह हे राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तरे द्यायच्या फंदात पडले नाहीत.
Amit Shah spoke just one-and-a-half sentences in Kolhapur; the secret of ‘Operation Tiger’ was revealed!!
महत्वाच्या बातम्या
- JD Vance’ : नेतान्याहूंना अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा? जे. डी. व्हान्स यांच्या लेबनॉन भूमिकेमुळे इस्रायलची चिंता वाढली
- US-Iran : अमेरिका-इराण कराराचा मसुदा जाहीर; होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची तरतूद
- Delhi Police : दिल्लीत आयएसआयचे मोठे दहशतवादी जाळे उद्ध्वस्त; आणखी 5 आरोपी जेरबंद, अटकेतील संख्या 12 वर
- शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!