• Download App
    "राष्ट्रीय" नेते शरद पवार कसबा - चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप - फ्लॉप!! Always national to local : flip flop politics of sharad Pawar

    “राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस जरी प्रादेशिक पक्ष असला तरी शरद पवार हे त्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत असतात. पण आता ते कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांमध्ये प्रचारात उतरल्याने त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वावर” सोशल मीडियात प्रश्नचिन्ह उमटवले जात आहे. Always national to local : flip flop politics of sharad Pawar

    सर्वसाधारणपणे कोणत्याही पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरचे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरत नाहीत. शरद पवारही त्याला सुरुवातीला अपवाद नव्हते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांनी पोटनिवडणुकीत प्रचार केला नव्हता. पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकांमध्ये देखील त्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला नव्हता. पण कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पवार प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. अर्थात आर आर आबा पाटला पाटलांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक तसेच पंढरपूर आणि कोल्हापूरची पोटनिवडणूक या काळात पवार हे सत्ताधारी आघाडीचे घटक होते, तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या काळात ते विरोधी पक्षांमध्ये आहेत.


    राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान


    चिंचवडच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात काही खुलासा केला आहे. चिंचवड हा मतदारसंघ पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग होता. त्यावेळी शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे आपल्या या मतदारसंघाशी भावनिक नाते असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण मग कसबा मतदार संघात त्यांचे असे कोणते भावनिक नाते आहे?, याचा मात्र खुलासा त्यांनी केलेला नाही.

    – पवारांचे फ्लिप – फ्लॉप

    त्याचबरोबर पवारांची राष्ट्रीय प्रादेशिक आणि स्थानिक अशा राजकारणाचे फ्लिप – फ्लॉप नेहमीच राहिले आहे. एकीकडे शरद पवार स्थानिक प्रश्न मला विचारू नका, असे पत्रकारांना सांगून त्यांना फटकारताना अनेक वेळा पाहण्यात आले आहेत. पण पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची सदस्यांची बैठक देखील त्यांनी घेतल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर विरोधी ऐक्य साधण्यासाठी भले रिटायर्ड झालेल्या का होईना, पण प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची बैठक त्यांनी दिल्लीच्या 6 जनपथ निवासस्थानी बोलावल्याचेही दिसले आहे.

    सोशल मीडियात पवारांच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणूक प्रचारावरून अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता पवारांचा हा स्थानिक प्रचार कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीवर नेमका काय परिणाम करतो??, तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांसाठी कितपत फलद्रूप ठरतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Always national to local : flip flop politics of sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस