• Download App
    शिवसेना नेत्यांशी संपर्क साधूनही बेदखल केल्याचा पीडित तरुणीचा आरोप|Allegation of eviction of a young woman even after contacting Shiv Sena leaders

    शिवसेना नेत्यांशी संपर्क साधूनही बेदखल केल्याचा पीडित तरुणीचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर करणाऱ्या तरुणीने पुन्हा आरोप केले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधान परिषद उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे अत्याचाराची तक्रार करुनही कसली दाद दिली नाही, असे तिने सांगितले. Allegation of eviction of a young woman even after contacting Shiv Sena leaders

    लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरुन टीका करत कुचिक यांना जामीन देण्यात आल्याने संताप व्यक्त केला होता. या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचाही आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. पीडित तरुणीने फेसबुकवर आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केला होता.



    दरम्यान पीडित तरुणीनेशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. आपण संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही असा आरोप तरुणीने केला आहे. तसेच महिला आयोग आणि पोलिसांनी मदत न केल्यामुळेच आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो असा दावा केला आहे.

    एकदा अनेक प्रयत्न केल्यानंतर संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाठवले. गोऱ्हे यांनी संपर्क साधला. माझ्याकडून स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधीही मला फोनही केला नाही आणि विचारणाही केली नाही. संजय राऊतांनीही परत फोन केला नाही, असे या तरुणीचे म्हणणे आहे.

    Allegation of eviction of a young woman even after contacting Shiv Sena leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार; जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये याची तरतूद करू

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे

    Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी