• Download App
    बैलगाडा शर्यतीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे ; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आवाहनAll the rules of bullock cart race should be strictly followed; Appeal of Animal Husbandry Minister Sunil Kedar

    बैलगाडा शर्यतीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे ; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

    प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, 2017 च्यानियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली.All the rules of bullock cart race should be strictly followed; Appeal of Animal Husbandry Minister Sunil Kedar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशामुळे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यंत बंद होती.गेल्याच आठवड्यात न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.या प्रकरणी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

    राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे.दरम्यान पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे.



    पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, २०१७ च्या नियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.तसेच जर या नियमांचा भंग झाला तर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

    All the rules of bullock cart race should be strictly followed; Appeal of Animal Husbandry Minister Sunil Kedar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस