केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ आज (रविवार) सायंकाळी साडेपाचवाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. All party tribute meeting in memory of MP Girish Bapat today in Pune
या श्रद्धांजली सभेसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे नेते सचिन आहीर, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आदींची उपस्थिती असणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
याशिवाय गिरीश बापट हे बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) माजी विद्यार्थी होते. त्यामुळे काल महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटनेनेही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.
गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय जीवनात संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील कसबा मतदारसंघातून गिरीश बापट १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांनी काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत ते लोकसभेत पोहचले होते.
All party tribute meeting in memory of MP Girish Bapat today in Pune
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत
- अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!
- प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!
- BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!