विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाची धांदल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा आहे. लग्नाच्या चर्चांदरम्यान आता अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. अलीकडेच अभिनेत्री आलिया भट्टच्या काकांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नाची अंतिम तारीख जाहीर केली आहे. Alia, Ranbir wedding on April 14?
आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी आदल्या दिवशी एका मुलाखतीत लग्नाची तारीख उघड केली होती. अलीकडेच एका वेबसाइटशी बोलताना आलियाचे वडील महेश भट्ट यांचा सावत्र भाऊ रॉबिनने सांगितले की, आलिया आणि रणबीर १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. १३ एप्रिलला आलियाचा मेहंदी सोहळा पार पडणार आहे. रणवीर सिंगच्या वांद्रे येथील आरके हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे, जिथे या अभिनेत्याचे पालक ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचेही लग्न झाले होते.
त्याचवेळी रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने ‘देव जाणे असे उत्तर दिले. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात होता की, हे कपल १५ किंवा १७ एप्रिलला सात फेरे घेतील. मात्र, आता अभिनेत्रीच्या लग्नाच्या तारखेबाबतच्या अटकळांना पूर्णविराम देत काकाकडूनच लग्नाची अंतिम तारीख देण्यात आली आहे.
मात्र, याबाबत दोन्ही कलाकारांकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. पण बातम्यांनुसार, रणबीर-आलियाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नासाठी वेडिंग प्लॅनर्सपासून केटरर्सपर्यंत सर्वांचे बुकिंग झाले आहे. याशिवाय लग्नाचे कोणतेही चित्र बाहेर येऊ नये यासाठी अंगरक्षकही नेमण्यात आले आहेत.
Alia, Ranbir tied the knot on April 14
महत्त्वाच्या बातम्या
- महात्मा गांधी तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, त्यांचे पुतळे हटविल्यावर गोडसेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचे वक्तव्य
- मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय : आता रेशन दुकानांवर मिळणार फोर्टिफाइड तांदूळ, योजनेवर वर्षाला २७०० कोटी खर्च करणार सरकार
- 2050 पर्यंत देशातील 6 शहरे बुडणार : मुंबईतील एक हजार इमारती जाणार पाण्याखाली, हाजी अली आणि वरळी सी-लिंक पाण्याखाली जाणार