• Download App
    अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला, नवाब मलिकांचा आरोप। Akola and Nagpur Legislative Council elections saw huge horse-trading, alleges Nawab Malik

    अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला, नवाब मलिकांचा आरोप

    नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सहा जागांपैकी बावनकुळे यांच्यासह चार भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. भाजपच्या या विजयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी टीका केली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप त्यांनी केला. Akola and Nagpur Legislative Council elections saw huge horse-trading, alleges Nawab Malik


    प्रतिनिधी

    मुंबई : नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सहा जागांपैकी बावनकुळे यांच्यासह चार भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. भाजपच्या या विजयावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी टीका केली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

    मलिक म्हणाले की, अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याच धर्तीवर कायदा झाला पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

    राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

    राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू, मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्र सरकारने कायदा करून ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पद्धतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्रसरकारकडे करू, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

    Akola and Nagpur Legislative Council elections saw huge horse-trading, alleges Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!