विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अजित पवारांनी दिल्ली शरणागत “यशवंत मार्ग” पत्करला, तर शरद पवार उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराडचा दौरा करणार आहेत.Ajitdada Surrenders to Delhi on “Yashwant Marga”; Sharad Pawar will visit Yashwant Samadhi tomorrow!!
दिल्ली समोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे, असे शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट लिहिले आहे, पण प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकार जाऊन वर्षपूर्ती झाली तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवारांचा गट “यशवंत मार्गाने” शिवसेना – भाजपच्या शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामील झाला.
या सरकारमधल्या सामील होण्याच्या निर्णयाला आपला पाठिंबा नाही, असे शरद पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर आपण उद्या कराड मधून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याचा अर्थ शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर दर्शनाला जाणार, तर अजितदादांनी आधीच दिल्लीच्या सत्तेबरोबर जाण्याचा यशवंत मार्ग चोखाळला आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी 1980 मध्ये इंदिरा गांधींना जेव्हा पूर्ण बहुमत मिळाले त्यावेळी त्यांच्यापुढे राजकीय शरणागती पत्करले. आपली चव्हाण- रेड्डी काँग्रेस गुंडाळून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बहुजनांना सत्तेशिवाय तरणोपाय नाही, असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढल्याचे स्मरण अनेकांनी करून दिले आहे. अजितदादांनी हाच “यशवंत मार्ग” पत्करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती करून महाराष्ट्राच्या विकासासाठी जनतेच्या हितासाठी आपण सत्तेत सहभागी होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आपण सत्तेत सहभागी आहोत, असे त्यांनी सांगितले.
मात्र अजितदादांच्या या वक्तव्याला शरद पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत छेद दिला. मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटात संताप उसळला होता, तसा संताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात उसळला नाही आणि स्वतः शरद पवारांची भूमिका राजकीय दृष्ट्या अतिशय संयमित त्यामुळेच “संशयास्पद” राहिली.
शरद पवारांच्या या भूमिकेविषयी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करून शरद पवारांना उद्धव ठाकरेंचे ओझे उतरवायचे होते म्हणून राष्ट्रवादीची पहिली टीम त्यांनी सत्तेत पाठवली आहे. दुसरी टीम लवकरच सत्तेत सहभागी होईल, असे म्हटले आहे. त्या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवारांनी दुसरी शिल्लक टीम कोणती आहे हे तर बघू द्या!!, अशी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त करत आपला “सॉफ्ट स्टॅन्ड” कायम ठेवला.
बाकी ममता बॅनर्जींचे फोन आला, उद्धव ठाकरेंचा फोन आला, मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोन आला असे सांगून आपण अजूनही विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला, पण राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांवर कारवाई संदर्भात मात्र शरद पवारांनी अतिशय सावध भूमिका घेत याविषयी दोन दिवसांनी विचार करू, असे सांगितले.
शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेत याच सर्व “संशयाच्या जागा” असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसची एक टीम पवारांनी सत्तेत पाठवली आणि दुसरी टीम लवकरच सत्तेत जाण्याची शक्यता आहे, हेच यातून दिसून येते.
याचा अर्थ शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या राजकारण शैलीनुसार दोन डगरींवर पाय ठेवला आहे. एकीकडे अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध लटका राग व्यक्त करून दुसरीकडे आपण पक्ष बांधणीसाठी पुढे प्रयत्न करणार. नवा पक्ष उभा करणार, असे सांगितले त्याच वेळी नाराजी कुणाविषयीच नाही, असे सांगून अजितदादांबरोबरच्या बंडखोरांबद्दल “सॉफ्ट कॉर्नर” देखील ठेवला. यातून पवारांची दोन डगरींवर पाय ठेवण्याची दुहेरी नीतीच स्पष्ट झाली आहे.
पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रीद, हा पक्ष स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही हा इतिहास आहे, हे मात्र त्यामुळे खोटे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यशवंतनीतीनुसार दिल्लीच्या सत्तेपुढे शरणागत झाली आहे!!
Ajitdada Surrenders to Delhi on “Yashwant Marga”; Sharad Pawar will visit Yashwant Samadhi tomorrow!!
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल’’
- ‘’युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती…’’ आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!
- इतरांच्या मानवी चुका, पण फडणवीसांच्या द्वेषापोटी समृद्धी महामार्गावर ठपका!!
- ‘’पवार, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले’’ बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात!