• Download App
    |Ajitdada - Supriya Sule avoid meeting each other at Namo Rojgar Mela; Baramatikars see picture of "real" differences!!

    नमो रोजगार मेळाव्यात अजितदादा – सुप्रिया सुळेंनी टाळली एकमेकांची भेट; बारामतीकरांना दिसले “खऱ्या” मतभेदांचे चित्र!!

    विशेष प्रतिनिधी

    बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील अंतर्गत नाराजी आता प्रकर्षाने समोर येत असून जाहीर कार्यक्रमातूनही ती दिसत आहे. बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते, पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणे आणि भेटणे टाळले. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण अजितदादांची विचारपूस केली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात सार्वजनिक व्यासपीठावर तरी असे कधीच घडले नव्हते. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये “खरोखर” मतभेद निर्माण झाल्याचे चित्र बारामतीकरांसमोर निर्माण झाले.Ajitdada – Supriya Sule avoid meeting each other at Namo Rojgar Mela; Baramatikars see picture of “real” differences!!



    बारामतीत नमो बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांना बायपास करून सुप्रिया सुळे निघून गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली.

    विजय शिवतारे यांचीही भेट घेतली. पण बाजूलाच असलेल्या अजितदादांची साधी विचारपूसही केली नाही. किंवा भेटल्याही नाही. सुप्रिया यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली, पण अजितदादांना भेटणे टाळले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे स्टेजवर असल्याचं अजितदादांनाही माहिती होते. त्यांनीही सुप्रिया यांना भेटणे टाळले.

    पहिल्या रांगेत सुनेत्रा पवार

    यावेळी स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही या रांगेत बसलेल्या होत्या. पहिल्या रांगेत सुनेत्रा पवारही बसलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. एरव्ही कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

    Ajitdada – Supriya Sule avoid meeting each other at Namo Rojgar Mela; Baramatikars see picture of “real” differences!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना