• Download App
    जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले... Ajit Pawars reaction to police lathicharge on Maratha protesters in Jalna

    जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    …याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
    विशेष प्रतिनिधी
    जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीनं लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबड येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवरर झालेल्या लाठीमाराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे. Ajit Pawars reaction to police lathicharge on Maratha protesters in Jalna
    याचबरोबर ”जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो.  राज्यातील मराठा आंदोलनानं लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानंच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो.” असही अजित पवार म्हणाले आहे.
    याशिवाय, अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना आहे. असं ही अजित पवारांनी म्हटलं आहे.
    तर जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. पण त्याआधी पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु पोलिसांवर घेरून दगडफेक झाली. त्यात 12 पोलीस जखमी झाले आणि त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला, असा स्पष्ट खुलासा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    Ajit Pawars reaction to police lathicharge on Maratha protesters in Jalna

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला