• Download App
    Yugendra Pawar अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारही अडकणार विवाहबंधनात

    Yugendra Pawar : अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारही अडकणार विवाहबंधनात

    Yugendra Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Yugendra Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.Yugendra Pawar

    सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “युगेंद्र आणि तनिष्का या नवदांपत्याला आयुष्यातील नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ईश्वर त्यांच्या नव्या वाटचालीत त्यांना सुख, समाधान आणि यश देवो, हीच प्रार्थना.”

    या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र आणि तनिष्काच्या विवाहसोहळ्याबाबत अधिक तपशील जाहीर केला नाही.

    युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. युगेंद्र पवार हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार यांचा तनिष्का प्रभू यांच्यासोबत घरगुती पध्दतीने साखरपुडा झाला आहे. तनिष्का प्रभू या मूळच्या मुंबईच्या आहेत. तनिष्का यांचे शिक्षण परदेशात फायनान्स क्षेत्रात झाले आहे.



    युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1991 रोजी झाला आहे. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहे. युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले होते. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा 10 एप्रिल रोजी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांच्या सोबत साखरपुडा पार पडला होता. यानंतर पवार कुटुंबातील युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी आता किती दिवस एकट्याचेच अभिनंदन करायचे, आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. आता फार लांबवू नका, अशा हटके शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या. आता जय पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार यांनी नंबर लावलाय. त्यांचा नुकताच तनिष्का प्रभू (Tanishka Prabhu) यांच्यासोबत साखरपुडा झालाय.

    Ajit Pawar’s nephew Yugendra Pawar will also get married

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !