विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जुन्या नेत्यांच्या वयावरून संघर्ष उफाळला असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचे 84 वय काढले आणि त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला. त्याचवेळी त्यांनी रोहित पवारांना “बच्चा” म्हटले. त्याबद्दल एका पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.Ajit pawar targets sharad pawar and rohit pawar over their age, but supriya sule pinched rohit pawar
शरद पवारांचे वय 84 असले म्हणून काय झाले, ते आजही भरपूर काम करतात. रोहित पवारांचा काका म्हणून अजितदादा रोहितला कदाचित बच्चा म्हटले असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण एक ऑब्झर्वेशन सांगते, रोहित आड ज्या वयात आहे, त्या वयात आदरणीय पवार साहेब मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
पण त्यांच्या या वक्तव्यामुळे वक्तव्यातून त्यांनी अजितदादांना टोला हाणला की रोहित पवार या वयात फक्त पहिल्या टर्मचे आमदार आहेत असे सूचित करून रोहित पवारांचेच वाभाडे काढले??, असा सवाल तयार झाला आहे.
शरदनिष्ठ राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यानंतर दोन नंबर असण्यावरून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात सुप्त स्पर्धा असल्याच्या मराठी माध्यमांमध्ये आधीच बातम्या आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचे रोहितच्या वयात पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते, हे वक्तव्य रोहित पवारांचेच वाभाडे काढणारे ठरत असल्याचे दिसून येते.
अजितदादा यांच्या या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ठीक आहे. ही लोकशाही आहे. 84 वय असूनही ते इतकं काम करत आहेत. दादासाठी अडचण कशाला?? त्यांचा करिअर ग्राफ बघा.
माझं सगळं आयुष्य सोशल मीडियावर आहे. मी देखील 16 तास काम करते. तुम्हाला माहितीच आहे. अजितदादा आता सीनिअर सिटिझन आहे. माझ्यापेक्षा ते दहा वर्षांनी मोठे आहेत. दादांपेक्षा रोहित छोटा आहे. रोहित पवारांचा काका या नात्याने अजितदादांनी त्याला बच्चा म्हटले असेल पण रोहित आज ज्या वयात आहे, त्या वयात पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माझ्यावर चव्हाणांचे संस्कार
तुम्ही सारखी अजितदादांची बाजू का घेता? असा सवाल त्यांना यावेळी करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कृतीत वाढलेली मुलगी आहे. मी कधीच आरे कारे करत नाही. माझ्यावर हा संस्कार नाही. भाजपवाले मला म्हणतात की, किती चांगला बोलता, असं त्यांनी सांगितलं.
कायद्याचे ज्ञान वाढले
शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य अवलंबून नाही. हा निर्णय आल्यावर बघू. राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी कधीही तयार असतो. सहा महिन्यात आमचे जरा कायद्याचे ज्ञान वाढले आहे, असंही त्या म्हणाल्या.
मुंबईतील दक्षिण आणि ईशान्य लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत वाद आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार गटातील दक्षिण आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरून वाद मिटवला जाईल. त्याची फार चिंता वाटत नाही, शरद पवार तिढा सोडवतील. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 8 ते 10 दिवसात अधिकृत जाहीर केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
आंबेडकर आघाडीत दिसतील
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर मनापासून आनंद होईल. त्यांना संसदेत पाहायला मला आवडेल. लवकरच “इंडिया” आघाडीचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल. त्यात आंबेडकर दिसतील याचा मला विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं.
Ajit pawar targets sharad pawar and rohit pawar over their age, but supriya sule pinched rohit pawar
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!
- INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा
- “जुना भारत” समजून खेळायला गेले कुस्ती; मोदींच्या नव्या भारताने उतरवली मालदीवची मस्ती!!
- टीएमसी नेत्याविरोधात जारी केलेल्या लुकआउट नोटीसीवरून काँग्रेसची खोचक टिप्पणी