• Download App
    लाडकी बहिण योजनेवर मराठी माध्यमांच्या शंका आणि खुसपटे; अजितदादांनी परखड शब्दांत काढले वाभाडे!! ajit pawar targets faluse news in marathi media about ladies bahin yojna

    लाडकी बहिण योजनेवर मराठी माध्यमांच्या शंका आणि खुसपटे; अजितदादांनी परखड शब्दांत काढले वाभाडे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या लाडकी बहिण योजनेवर मराठी माध्यमांनी काही शंका उपस्थित करून खुसपटे काढली. या योजनेला महाराष्ट्राच्या अर्थ विभागाचा विरोध असल्याचा “जावईशोध” लावला. परंतु, प्रत्यक्षात महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी मात्र, या शंका आणि खुसपटांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून चोख प्रत्युत्तर देत मराठी माध्यमांचे वाभाडे काढले. ajit pawar targets faluse news in marathi media about ladies bahin yojna

    लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याचा खोटा दावा माध्यमांनी केला आहे. माध्यमांनी दिलेल्या बातम्या चुकीच्या आणि कपोलकल्पित आहेत, असे अजित दादांनी ह्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे .

    अजितदादांची पोस्ट अशी :

    महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.

    चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार??, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

    राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही.

    काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया…!!

    ajit pawar targets faluse news in marathi media about ladies bahin yojna

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस