• Download App
    पुण्यातील गर्दीसाठी अजित पवारांवरही गुन्हा दाखल करावा, प्रवीण दरेकर यांची मागणी|Ajit Pawar should also be charged for the crowd in Pune, demanded Praveen Darekar

    पुण्यातील गर्दीसाठी अजित पवारांवरही गुन्हा दाखल करावा, प्रवीण दरेकर यांची मागणी

    पुणे येथे 19 जूनला झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गदीर्ला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.Ajit Pawar should also be charged for the crowd in Pune, demanded Praveen Darekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पुणे येथे 19 जूनला झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गदीर्ला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

    दरेकर म्हणाले,  पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीत केवळ 150 नाही, तर सुमारे 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे फक्त दीडशे कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला? असा सवाल करून दरेकर म्हणाले, विनायक मेटे यांच्या बीडच्या मराठा मोर्चामध्ये सहभागी 3 हजार कार्यकर्त्यांवर गर्दी जमा केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.



    बीडमध्ये विनायक मेटे यांना जो न्याय दिला तोच समान न्याय पुणे येथील कार्यक्रमाला लावला पाहिजे. मी आणि मंगल प्रभात लोढा यांनी सायन हॉस्पिटलच्या वैद्यकीय दुरावस्थेसंदर्भात आंदोलन केलं. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले ममता बॅनर्जींच्या हिंसाचाराच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन केले. तेव्हा 10 जणांमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन आंदोलन केले तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल केला.

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरु शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती.
    अजित पवार यांनी दुपारी घेतलेल्या बैठकीत पर्यटनस्थळी जाण्यासही नागरिकांना बंदी घातली.

    त्यांना १५ दिवस क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला. त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यामुळे सोशल मीडियात अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार होत आहे.

    Ajit Pawar should also be charged for the crowd in Pune, demanded Praveen Darekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!