विशेष प्रतिनिधी
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या धरणाच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहे. पण त्यांना माहिती नाही तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तिजोरीच्या चाव्या उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. नाहीतर ते काय देणार घंटा… असे म्हटले आहे.Ajit Pawar reminded about the dam statement
सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत, असे अजित पवार म्हणाले.
मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, नाहीतर काय देणार घंटा ? असेही अजित पवार म्हणाले. यावर आता गाडी घसरायला लागलीय त्यामुळे थांबतो, असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.पवार म्हणाले, आमच्या दिलीपराव यांनी चांगले काम केले आहे.
इतरांनीही चांगले काम करावे. आपल्या परिसरात चांगले काम करून आर्थिक परिस्थितीत सुधारावी, इतरांची परिस्थितीही चांगली करावी. आपल्या काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे चांगले काम करावे.
धरणातल्या पाणीसाठ्यावरून काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी केलेल्या विधानाचा उल्लेख विरोधक आजही करतात. त्यामुळे आजदेखील कार्यक्रमात आपली गाडी घसरत असल्यायचे लक्षात येताच, आता गाडी घसरायला लागलीये, त्यामुळे आवरते घेतो, असे म्हणत अजित पवारांनी पुढे होऊ शकणारा वाद टाळण्याचा प्रयत्न केला.
Ajit Pawar reminded about the dam statement
महत्त्वाच्या बातम्या
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर