विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादांची मोदी तारीफ, फडणवीसांची पवार स्तुती, होतीय का पुन्हा युती की नुसतीच डोळे मारामारी??, अशी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे. कारण अजितदादांनी खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चमत्काराची तारीफ केली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टार्गेट करताना पवारांच्या चार वेळच्या मुख्यमंत्री पदाची आणि जेष्ठत्वाची स्तुती केली आहे. पण त्यामुळेच पहाटेच्या शपथविधीसाठी फडणवीस – अजितदादा पुन्हा युती होणार की ही नुसतीच डोळे मारामारी सुरू आहे??, असा असा सवाल तयार झाला आहे. Ajit Pawar praise Narendra modi and devendra Fadanavis Tweet favour sharad Pawar raised political eyebrows
अजितदादांची मोदी तारीफ
अजितदादा 17 तास नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते पुण्यात पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सामील झाले. त्याविषयी खुलासा देताना अजितदादांनी मोदींच्या नेतृत्वाची तारीफ केली आहे. 2014 मध्ये मोदींच्या करिश्माने भाजपला बहुमत मिळाले. 2019 मध्ये त्यापेक्षाही मोठे बहुमत मिळाले हा मोदींचा चमत्कार नाहीतर दुसरे काय आहे??, असा सवाल करून अजितदादांनी मोदींच्या नेतृत्वाची तारीफ केली, तर दुसरीकडे शरद पवारांनी अदानी मुद्द्यावर मोदी आणि अदानींना अनुकूल भूमिका घेतल्यानंतर राहुल गांधी समर्थक नेत्यांनी पवारांवर लालची नेता म्हणून टीका करायला सुरुवात केली. त्या मुद्द्यावरून संतप्त होऊन फडणवीसंनी ट्विट करून राहुल गांधींना कटघऱ्यात खडे केले.
अलका लांबांचे ट्विट, फडणवीसांचे उत्तर
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी पवार मोदी आणि अदानी यांना टार्गेट करणारे ट्विट केले. लालची लोग अब अपने हित को बचाने के लिए तानाशाह की तारीफ कर रहे है, अशा आशयाचे ते ट्विट होते. अलका लांब यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि 35 वर्षांच्या मित्र पक्षाच्या मुख्य नेत्याला असे टार्गेट करून राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती खराब करत आहेत, असे शरसंधान फडणवीस यांनी साधले आहे.
नवे समीकरण जुळणार की…
अजितदादांची मोदी तारीफ आणि फडणवीस यांची पवार स्तुती यांचे राजकीय टाइमिंग यात बरोबर साधले गेले आहे. ते पाहता महाराष्ट्रात काही नवी समीकरण जुळणार का??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण त्याचवेळी हे समीकरण पहाटेच्या शपथविधीनंतर जुळले नाही तर आता शिवसेना – भाजप युतीचे प्रत्यक्ष सरकार अस्तित्वात असताना आता कसे जुळेल??, अशीही वेगळी चर्चा आहे. त्यामुळेच अजितदादा आणि फडणवीस यांची खरंच युती होते आहे, की काँग्रेस आणि राहुल गांधी यांची खेचण्यासाठी नुसतीच डोळे मारामारी सुरू आहे??, हा सवाल तयार झाला आहे.
Ajit Pawar praise Narendra modi and devendra Fadanavis Tweet favour sharad Pawar raised political eyebrows
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट
- कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा
- राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे
- तामिळनाडूतील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकात अमूल VS नंदिनी; काँग्रेसचा आरोप- गुजरात मॉडेलची गरज नाही! वाचा सविस्त