• Download App
    Ajit Pawar : लोकांना फुकट पाणी आणि वीज आवडते, पण त्यात सगळा महसूल खर्च होतो; अजित पवारांचे वक्तव्य!! । Ajit Pawar: People love free water and electricity, but it costs all the revenue; Ajit Pawar's statement !!

    Ajit Pawar : लोकांना फुकट पाणी आणि वीज आवडते, पण त्यात सगळा महसूल खर्च होतो; अजित पवारांचे वक्तव्य!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : लोकांना फुकट पाणी आणि वीज मिळणे आवडते त्यांना ते हवे असते पण ते देण्यातच सगळा महसूल खर्च होतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. Ajit Pawar: People love free water and electricity, but it costs all the revenue; Ajit Pawar’s statement !!

    अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून त्यावर वाद निर्माण होतो आहे. लोकांना फुकट पाणी आणि वीज या घोषणांचे आकर्षण असते. निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष तशा लोकप्रिय घोषणा करतात. परंतु त्यामुळे विकासासाठी वापरू शकू असा सर्व महसूल वीज आणि पाणी मोफत देण्याचा खर्च होतो. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दूरदृष्टीने अशा लोकप्रिय घोषणांचा नेमका विचार करावा आणि विकासावर अधिक कसा खर्च होईल यावर भर द्यावा, असे अजित पवार म्हणाले.

    त्याचबरोबर पेट्रोल – डिझेल यांच्यावरील कर केंद्र सरकारनेच आणखी कमी करावा. महाराष्ट्राला ते शक्य नाही आणि महाराष्ट्रातील जनतेवर या पेक्षा अधिक कर अर्थमंत्री म्हणून आपण लादू शकत नाही, असे वक्तव्य देखील अजित पवार यांनी केले आहे.

    Ajit Pawar : People love free water and electricity, but it costs all the revenue; Ajit Pawar’s statement !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!