विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.Ajit Pawar
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते. आषाढी असेल, महाशिवरात्री असेल, महावीर जयंती असेल, अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस बंदी घातली जाते. आता देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत. आपल्या देशात, राज्यात काही जण शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. आता तुम्ही कोकणात जर गेलात तर साधी भाजी करताना पण तिथे सुकट, बोंबील असलं काही त्यात घालतात. कारण, तो त्यांचा आहार आहे. त्यांचा आहार त्यांना घ्यायला बंदी घालणे हे बरोबर नाही, उचित नाही.Ajit Pawar
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसपूर्ते किंवा काही दिवसांसाठी बंदी असेल तर लोक स्वीकारतात. परंतु, तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागलात तर उलट अवघडच आहे. ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो तेव्हा बकरा कापतात आणि साजरा करतात. लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. परंतु, भावनेचा आणि श्रद्धेचा विषय जेव्हा येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या दृष्टीने बघावे. आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितले तर त्यांचा मोठ्या प्रमाणातला आहार हा मांसाहारच असतो.
राधाकृष्ण विखे पाटलांना गैरसमज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यांना जीवनदान दिले, पण अभिनंदनाच्या बॅनरवर त्यांचा फोटो नाही. यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी अशी टीका केली होती. यावर अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटलांचा काही तरी गैरसमज झाला आहे. मी एका कारखान्याचा चेअरमन आहे. तिथे मला एकाने सांगितले की 22 तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची, त्यावर मी म्हटले की अजिबात जाहिरातबाजी करायची नाही. ज्यांना कोणाला करायची असेल ते स्वखर्चाने करतील. आपण कारखान्यात शेतकऱ्यांना चांगला भाव, कामगारांना योग्य पद्धतीने मानधन देण्यासाठी आपण बांधील आहोत असे सांगितले आहे.
मी राधाकृष्ण विखे पाटलांशी यावर बोलेल. मी कशाला असे करू? मी स्वतः स्वीकारतो न की इथेनॉलला पेट्रोलमध्ये काही प्रमाणात मिक्स करण्याचे बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळे कारखानदारीला मदत झाली आहे. याचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनाच जाते.
रायगड पालकमंत्री पदावर भरत गोगावले नाराज असल्याचे बोलले जात असल्याचे म्हटले जात आहे. यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, कोणाला जिल्ह्याचे पालकमंत्री करायचे, कोणाला कोणती मंत्रिपद द्यायची, कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे याचा अधिकार घटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितले आहे की त्या दोन ठिकाणी कोणाला पालकमंत्री करायचे याचा निर्णय आम्ही घेऊ. तसेच पालकमंत्री नाही म्हणून तिथले काम अडले जाणार नाहीत.
Ajit Pawar Objects Non-Veg Ban August 15
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगावर नुसते Hit and Run करून राहुल गांधींना मोदींची सत्ता घालवता येईल का??
- महादेवपुराचे उदाहरण देणाऱ्या राहुल गांधींना बारामतीचे उदाहरण देऊन अजितदादांचे प्रत्युत्तर!!
- Israeli Attack : इस्रायली हल्ल्यात अल जझीराचे 5 पत्रकार ठार; इस्रायलने त्यांना हमास दहशतवादी म्हटले
- Parinay Phuke : बेताल विधाने करून मनाेज जरांगेंचा मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न, परिणय फुके यांची टीका