• Download App
    Ajit pawar अजितदादांच्या वेषांतराचे आरोप 4 - 5 दिवस चालले,

    Ajit pawar : अजितदादांच्या वेषांतराचे आरोप 4 – 5 दिवस चालले, सुळे + राऊतांनी भाजपावर तोंडसुख घेतले; अजितदादांनी आता मौन सोडले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित वेषांतराचे आरोप महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात 4 – 5 दिवस चालले. खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी त्यानिमित्ताने भाजपावर तोंडसुख घेतले. Ajit pawar now broke his silence

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही दिवसांपासून अडचणीत आले आहेत. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या. त्या बैठकांना जाण्यासाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने जात होतो. विमान प्रवासासाठी स्वतःचे नाव देखील बदलले होते, असे त्यांनीच खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले होते, तशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. अजितदादांनी पत्रकारांसमोर दिल्लीपर्यंतच्या विमान प्रवासाचा संपूर्ण घटनाक्रम कथन केल्याचे माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले होते.

    त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांना आणि भाजप नेतृत्वाला घेरले होते. हा विषय महाराष्ट्रात मराठी माध्यमांनी तापत ठेवला होता. तेव्हा अजितदादांनी ताबडतोब कुठला खुलासा केला नाही.
    आज मात्र त्यांनी मौन सोडत खुलासा केला. आपण वेषांतर करुन दिल्लीला गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत. ते सिद्ध झाले तर राजकारण सोडू, अशी दमबाजी अजितदादांनी केली.



    अजित पवार म्हणाले :

    मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही. परंतु वेगवेगळ्या बातम्या पेरुन आमची बदनामी केली जात आहे. फेक नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. आमच्या चांगल्या योजना येत असल्याने विरोधक हादरले. त्यामुळे त्यांनी असे उद्योग चालवले आहे. मी वेशभूषा बदलून दिल्लीला गेलो हे साफ खोटे आहे. मला कुठे जायचे असेल उघडपणे जाईल. मला घाबरण्याची गरज नाही. वेषांतराचे आरोप खरे ठरले तर राजकारण सोडून देईल.

    संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

    माझी बदनामी करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. राज्यात वाचाळवीरांची संख्याही वाढली आहे. सकाळचा जो भोंगा असतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होत असतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केला. ज्या वेळी हा प्रकार घडला तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. समाजातील सर्वच लोक मला ओळखतात. त्यामुळे असे घडणे अशक्य आहे. सध्या हे जे चालले आहे ते सर्व चुकीचे आहे. त्या बातम्यांना काहीच आधार नाही. कुठलाही पुरावा नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.

    Ajit pawar now broke his silence

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ