वृत्तसंस्था
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव पुढील आदेशापर्यंत वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१९ फेब्रुवारी) दिली.Ajit Pawar Faction’s whip in elections is not applicable to Sharad Pawar group; order of the Supreme Court
२० फेब्रुवारीस होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष आणि २६ फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या नियमित अधिवेशनात शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे.
दोन्ही अधिवेशनांसह २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवार समर्थक आमदार, खासदारांना अजितदादा गटाचा व्हीप लागू होणार नाही.
७ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने अजित गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता दिली. घड्याळ चिन्हही दिले. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनीही आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार तसेच शरद पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले.
त्याविरुद्ध शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत, के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शरद गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे ८ दिवसांत अर्ज करावा आणि आयोगाने त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने बजावले.
Ajit Pawar Faction’s whip in elections is not applicable to Sharad Pawar group; order of the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉनची भरदिवसा हत्या, लग्न समारंभात हल्लेखोराने केला गोळीबार
- नवाझ शरीफ यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यास बिलावल यांचा नकार!
- “वायनाडला न जाता अमेठीतून लढून दाखवा…” स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान
- ‘काँग्रेसने १५ पेक्षा जास्त जागा मागितल्या, तर उत्तर प्रदेशमध्ये…’ ; ‘सपा’चा अल्टिमेटम!